नाशिक (Nashik) जिल्ह्यातील लासलगाव (Lasalgaon) येथे एका मायलेकाचा धक्कादायक मृत्यु झाल्याचे समजत आहे. एसटी मध्ये कंंडक्टर म्हणुन कार्यरत असलेल्या अंजली भुसनळे या महिलेने आपला तरुण मुलगा उत्कर्ष भुसनळे याच्या सोबत चक्क रेल्वेच्या इंंजिन समोर उडी मारली आणि यातच त्या दोघांंचाही मृत्यु झाला. भुसनळे यांंनी आत्महत्या (Suicide) करण्याच्या हेतुनेच अशी उडी मारली होती मात्र त्यासाठी नेमके काय कारण असावे याबाबत पोलिसांंनी तपास सुरु केला आहे, मात्र अद्याप तरी या मृत्युमागचे ठोस कारण समोर आलेले नाही, दुसरीकडे भुसनळे यांंच्या मृत्युनंंतर त्या राहत असणार्या भागातील शेजार्यांंनी दुःख व्यक्त केले आहे. Suicide In Sangli: इलेक्ट्रिक कटर मशीनने स्वतःचा गळा चिरून एका व्यक्तीची आत्महत्या; सांगली येथील घटना
प्राप्त माहितीनुसार, अंजली व उत्कर्ष भुसनळे यांंचे मृतदेह सध्या शवविच्छेदनासाठी सरकारी रुग्णालयात धाडण्यात आला आहे. अंजली या येवला बस आगारात मागील काही वर्ष कंंडक्टर म्हणुन काम करत होत्या. आज सकाळी अंजली आणि उत्कर्ष हे दोघे लासलगाव स्थानकात पोहचले आणि समोरुन येणार्या रेल्वे इंंजिनाखाली त्यांंनी उडी घेत आत्महत्या केली. यानंंतर स्टेशन मास्तरांंना माहिती मिळताच रेल्वे पोलिसांंनी घटनास्थळी धाव घेउन हे मृतदेह ताब्यात घेतले.
दरम्यान, कोरोना काळात मानसिक नैराश्य, घरगुती हिंंसाचार, आर्थिक संकट अशा अनेक कारणांंमुळे आत्महत्यांंचे प्रमाण वाढले आहे. जगात सुमारे 40 सेकंदला एक व्यक्ती आत्महत्या करत आहे. मृत्यूच्या कारणामध्ये हे 15 व्या क्रमाकांचं कारण आहे. स्त्रियांच्या तुलनेमध्ये पुरूषांमध्ये आत्महत्या करण्याचं प्रमाण अधिक आहे. असे विचार तुमच्या किंंवा तुमच्या ओळखीतील कुणाच्याही डोक्यात येत असल्यास अशा व्यक्तींशी संवाद साधा,सुसाईड प्रिव्हेंशन साठी शासकीय व खाजगी अशा अनेक हेल्पलाईन उपलब्ध आहेत त्यावर बिनदिक्कत संपर्क करा.