महाराष्ट्रात कोरोना संकट ओसरत असताना थोडी निर्बंधांमध्ये सूट मिळताच अनेकांचा मुंबई बाहेर पडून विकेंड एन्जॉय करण्याचा प्लॅन बनत आहे. अशामध्येच नाशिकच्या (Nashik) इगतपूरी (Igatpuri) मध्ये पोलिसांनी एका रेव्ह पार्टीवर छापा टाकला आहे. रिसॉर्टमध्ये सुरू असलेल्या रेव्ह पार्टीची टीप मिळताच पोलिसांनी कारवाई केली आहे. मीडीया रिपोर्ट्सनुसार या रेव्ह पार्टीच्या धाडेमध्ये 22 जण ताब्यात घेण्यात आले आहेत. त्यामध्ये बिग बॉस फेम अभिनेत्रीचा देखील समावेश आहे. दरम्यान 4 जण हे सिनेसृष्टीशी निगडीत आहेत.(नक्की वाचा: Mumbai: पंचतारांकित हॉटेलमध्ये 'या' अभिनेत्रीच्या वाढदिवसाच्या पार्टीत ड्रग्जचा वापर, पोलिसांकडून अटक).
शनिवार, 26 जूनच्या रात्री इगतपुरीमध्ये मानस रिसॉर्टच्या हद्दीत स्काय ताज विला या बंगल्यात रेव्ह पार्टी सुरू असल्याची माहिती नाशिक ग्रामीण पोलिसांना मिळाली. त्यांनी रात्री 2 च्या सुमारास कारवाई केली तेव्हा या पार्टीमध्ये महिला आणि पुरूष मादक द्रव्य घेत असलेल्या अवस्थेमध्ये आढळल्याचं सांगण्यात आले आहे. नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी ही टीम सोबत कारवाई करताना 10 पुरूष आणि 12 महिलांना ताब्यात घेतल्याचं वृत्त आहे.
ANI Tweet
Maharashtra: Police raided a party & took 22 people including actors, choreographers into custody. The team recovered drugs & cash from the spot. Detainees are undergoing medical examination. Details awaited: Nashik Rural Police
— ANI (@ANI) June 27, 2021
दरम्यान पोलिसांनी या रेव्ह पार्टीज मध्ये ड्रग्स, काही रोकड जप्त केली आहे. तर अटक केलेल्यांची वैद्यकीय तपासणी देखील करण्यात आली आहे. पार्टीत सहभागी झालेले तरूण तरूणी ड्रग्ज आणि हुक्काचं सेवन करत होते, अशी माहिती पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी दिली आहे. इगतपुरीतील एका रिसॉर्टमध्ये अवैध काम सुरु असल्याची टीप पोलिसांना मिळाली. या टीप वरूनच पोलिसांना या रेव्ह पार्टीवर धाड टाकता आली आहे.
मागील वर्षभरामध्ये सुशांत राजपूत मृत्यू प्रकरणानंतर झगमगत्या सिनेविश्वाची काळी बाजू देखील मोठ्या प्रकर्षाने समोर आली होती. यामध्ये ड्रग्स सेवन आणि त्यासंबंधी घडामोडींमध्ये अनेक लहान-मोठ्या कलाकारांची नावं समोर आली होती.