
नाशिक (Nashik) येथील सप्तशृंगी (Saptashrungi) गडाजवळच्या एका शिखरावर विवाहित दांपत्य देवदर्शनासाठी आले होते. परंतु देवदर्शनावेळी या दोघांत काही कारणावरुन भांडण झाल्याने संतापलेल्या नवऱ्याने चक्क बायकोला 800 फूट दरीत ढकलल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकारानंतर नवऱ्याने घटनास्थळावरुन पळ काढण्याचा प्रयत्न केला. परंतु मंदिरातील अन्य भाविकांनी त्याला पकडले.
टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, बाबूलाल काळे असे आरोपीचे नाव असून तो मध्यप्रदेशचा रहिवाशी आहे. तर पत्नी कविता आणि बाबूलाल यांनी सप्तशृंगीचे दर्शन घेतले. त्यानंतर जवळच असलेल्या एका शिखरावर पुन्हा एकदा देवदर्शनासाठी गेले असता त्या दोघांत कडाक्याचे भांडण झाले. यावरुन रागाने लाल झालेल्या बाबूलाल याने कविता हिला दरीत ढकलून दिले.(आपल्या मनाविरुद्ध प्रेमविवाह केल्याने जन्मदात्या पित्यानेच केली गर्भवती मुलीची हत्या)
तर कविताला दरीत ढकलत असल्याचा प्रकार तेथील एका व्यक्तीने पाहिला. त्यानंतर त्या व्यक्तीने आरडाओरड केल्यानंतर मंदिरातील भाविकांनी घटनास्थळी धाव घेत बाबूलाल याला पकडत पोलिसांच्या हवाली केले.