Narayan Rane | (Photo Credits: Facebook)

कोण शिवसेना (Shiv Sena), नारायण राणे (Narayan Rane) काय साधा माणूस वाटला काय? उगाचच काहीही बातम्या दाखवू नका. माझ्यावर गुन्हा दाखल करण्याबबतची कोणतीही माहिती नाही. जेव्हा माहिती मिळेल तेव्हा पाहू. प्रसारमाध्यमांनी उगाचच बातम्या पसरवून नये, अन्यथा अशा बातम्या दाखवणाऱ्यांवरच गुन्हा दाखल करेन, असे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी म्हटले आहे. नारायण राणे हे चिपळूण (Chiplun ) येथे बोलत होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरुन नारायण राणे जोरदार चर्चेत आले आहेत. नारायण राणे यांच्यावर नाशिक (Nashik Police), पुणे (Pune)  आणि महाड (Mahad) येथे गुन्हा दाखल झाल्याचे वृत्त आहे.

मी कोणताही गुन्हा केला नाही- नारायण राणे

नारायण राणे यांनी पुढे म्हटले की, मी कोणताही गुन्हा केला नाही. माझ्यावर कोणताही गुन्हा नाही. मी कोणाला घाबरत नाही. गेली 52 वर्षे मी राजकारणात आहे. गुन्हा कोठे घडतो हे मला माहिती आहे. माहितीच्या आधाराशिवाय मी एकही उत्तर देणार नाही. मी प्रसारमाध्यमांच्या प्रश्नांना उत्तरे देण्यास बांधील नाही. मी तुमच्या (प्रसारमाध्यमांच्या) बातम्यांवर विश्वास ठेवणार नाही. (हेही वाचा, Shiv Sena MLA Sanjay Gaikwad ON Narayan Rane: 'घरात घुसून हिशोब चुकता करु', शिवसेना आमदार संजय गायकवाड यांचा नारायण राणे यांना इशारा)

'नारायण राणे यांनी शिवसेना सोडली तेव्हाच..'

नाशिक येथे बडगुजर यांनी दाखल केलेल्या गुन्ह्याबाबत बोलताना नारायण राणे यांनी म्हटले की, कोण बडगुजर मला माहिती नाही. नारायण राणे यांनी शिवसेना सोडली तेव्हाच ते शिवसैनिक गेले.

ट्विट

'पाहू हे कुठपर्यंत उडी मारतात ते'

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जेव्हा बोलतात तेव्हा तो गुन्हा नसतो का? चिथावणीखोर वक्तव्ये करतात तो गुन्हा नसतो का? 15 ऑगस्ट हा देशाचा वर्धापण दिन आहे हे मुख्यमंत्र्याला माहिती नसेल तर तो खरा राष्ट्रद्रोह आहे, असे नारायण राणे म्हणाले. आमचेही सरकार वर केंद्रात आहे. त्यामुळे पाहू हे कुठपर्यंत उडी मारतात ते.