नांदेड साधू हत्या प्रकरण (Photo Credits-ANI)

महाराष्ट्रातील नांदेड (Nanded)  मधील  उमरी येथे एका साधूची हत्या करण्यात आल्यानंतर मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली होती. साधूची हत्या करण्यात आल्याची घटना शनिवारची (23 मे) असून याबाबत पोलिसांकडून तपास सुरु करण्यात आला होता. परंतु कोणत्या कारणामुळे साधूची हत्या करण्यात आली याबाबत अद्याप स्पष्ट करण्यात आलेले नाही. तर आता पोलिसांनी या प्रकरणाशी संबंधित असलेल्या एका आरोपीला अटक केली आहे.(नांदेड: उमरी मध्ये साधूचा मृतदेह आश्रमात आढळल्याने खळबळ; पोलिस तपास सुरू)

 पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीबाबत अधिक माहिती देण्यात आली आहे. आरोपीच्या विरोधात गेल्या 10 वर्षांपूर्वी एका हत्येप्रकरणात आरोपीचा साथीदार असल्याचे समोर आले आहे. तसेच त्याच्यावर विनयभंगाचा गुन्हा सुद्धा दाखल असल्याचे नांदेडचे पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर यांनी स्पष्ट केले आहे.(नांदेड हत्याकांड प्रकरणातील आरोपींना कठोर शिक्षा व्हावी; विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची राज्य सरकारकडे मागणी)

यापूर्वी पालघर येथे सुद्धा दोन साधूंसह त्यांच्या ड्रायव्हरची हत्या करण्यात आल्याचा प्रकार समोर आला होता. या प्रकरणी जवळजवळ 160 जणांना पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आले होते. त्यापैकी 10 अल्पवयीन जणांना रिमांड होममध्ये पाठवण्यात आले होते. तसेच सरकारकडून पोलिसांवर सुद्धा कारवाई केली होती.