मुंबई जवळील पालघर येथील दोन साधूंची हत्या करण्यात आल्याची घटना ताजी असताना नांदेडमध्ये (Nanded) एक साधू आणि त्याच्या सेवेकऱ्याची हत्या करण्यात आली आहे. गावातीलच एका माथेफिरू तरुणाने महाराजांच्या मठात प्रवेश करून त्यांच्याजवळील ऐवज लुटला आणि त्यानंतर गळा दाबून हत्या केली. या घटनेने भाविकात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेने आता राजकीय वळण घेतल्याचे चिन्ह दिसू लागली आहे. नांदेड हत्याकांड प्रकरणातील आरोपींना तत्काळ अटक करून त्यांना कठोर शिक्षा होईल, हे सरकारने सुनिश्चित करावे, अशी मागणी त्यांनी देवेंद्र फडणवीस यांनी (Devendra Fadnavis) राज्य सरकारकडे (Maharashtra Government) केली आहे.
नागठाणा बुद्रुक येथील तरूणाने रात्री रविवारी दीड वाजताच्या सुमारास बालतपस्वी निर्वाण रुद्र पशुपतीनाथ महाराजांच्या मठात शिरून त्यांच्याकडे असलेला ऐवज लुटला. त्यानंतर त्यांची गळा दाबून हत्या केली. तसेच महाराजांच्या वाहनातून पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, आजूबाजूला असलेले लोक जागे झाले. त्यामुळे मारेकऱ्याने तेथून पळ काढला. बालतपस्वी निर्वाण रुद्र पशुपतीनाथ महाराजांचे पार्थिव शरीर उमरीच्या ग्रामीण रुग्णालयात ठेवण्यात आले आहे. या घटनेची माहिती मिळताच भाविकांनी ग्रामीण रुग्णालयात मोठी गर्दी करण्यास सुरुवात केली आहे. यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी मृतांना श्रद्धांजली वाहत राज्य सरकारवर बोट केले आहे.नांदेड जिल्ह्यात एक साधू आणि त्यांच्या सेवेकऱ्याची निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटना अतिशय धक्कादायक आणि मनाला वेदना देणारी आहे. माझी भावपूर्ण श्रद्धांजली. या घटनेतील आरोपींना तत्काळ अटक करून त्यांना कठोर शिक्षा होईल, हे सरकारने सुनिश्चित करावे, ही राज्य सरकारकडे मागणी आहे, अशा आशायाचे ट्विट त्यांनी केले आहे. हे देखील वाचा- मुंबई: UP चे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना बॉम्बने उडवण्याची धमकी देण्याबाबत चुनाभट्टी परिसरातून 25 वर्षीय तरूण महाराष्ट्र ATS कडून अटकेत!
देवेंद्र फडणवीस यांचे ट्वीट-
नांदेड जिल्ह्यात एक साधू आणि त्यांच्या सेवेकऱ्याची निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटना अतिशय धक्कादायक आणि मनाला वेदना देणारी आहे.
माझी भावपूर्ण श्रद्धांजली! 🙏🏽
या घटनेतील आरोपींना तत्काळ अटक करून त्यांना कठोर शिक्षा होईल, हे सरकारने सुनिश्चित करावे, ही राज्य सरकारकडे मागणी आहे.
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) May 24, 2020
ज्या मठात शिवाचार्य निर्वाणरुद्र पशुपतीनाथ महाराजांची हत्या झाली, त्याच मठातील बाथरूममध्ये आणखी एका व्यक्तीचा मृतदेह सापडला आहे. भगवान शिंदे असे मृताचे नाव आहे. या दुहेरी हत्याकाडांमुळे नांदेड जिल्हा हादरला आहे. या प्रकरणी उमरी पोलीस तपास करत आहेत.