वरिष्ठ अभिनेते किरण कुमार यांना कोरोनाची लागण; 10 दिवसांपासून स्वतःला केले होम क्वारंटाइन
Kiran Kumar (Photo Credit: Twitter)

कोरोना विषाणूने (Coronavirus) संपूर्ण भारताला हादरून सोडले आहे. देशात दिवसेंदिवस कोरोना विषाणूचे जाळे पसरत चालले आहे. सर्व सामान्यांसह राजकीय नेते आणि बॉलिवूडच्या अनेक कलाकारांनाही कोरोनाचा संसर्ग झाला आहे. यातच बॉलिवूडचे वरिष्ठ अभिनेते किरण कुमार (Kiran Kumar) यांनाही कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या दिवसांपूर्वीच किरण कुमार यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. त्यानंतर त्यांनी स्वतःला होम क्वारंटाइन केले आहे. किरण कुमार हे लहानशा चाचणीसाठी एका रुग्णालयात गेले होते. त्यावेळी त्यांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे, असे सांगण्यात आले होते. किरण कुमार यांना कोरोनाची लागण झाल्याचे कळताच त्यांच्या चाहत्यांमध्ये चिंताजनक वातावरण निर्माण झाले आहे.

महाराष्ट्रासह संपूर्ण देशात कोरोना विषाणूचे प्रादुर्भाव वाढत चालले आहे. कोरोना विषाणूवर मात करण्यासाठी प्रशासनाकडून युद्धपातळीवर प्रयत्न केले जात आहे. मात्र, तरीही कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होऊ लागली आहे. कोरोना विषाणूच्या भितीने प्रत्येकजण धास्तावून गेले असताना किरण कुमार यांच्या बातमीने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. दरम्यान, 'माझ्या शरीरात कोरोनाचे कोणतेही लक्षण नव्हते दिसून आली नव्हती. मला ना खोकला, ना ताप, ना श्वास घ्यायला त्रास ,काहीच नव्हते. मी पूर्णपणे निरोगी होतो. खबरदारीचा उपाय म्हणून मी स्वतःला होम क्वारंटाइन केले आहे. माझ्या घराला दोन मजले आहेत. पहिल्या मजल्यावर माझी पत्नी आणि मुले राहत असून मी स्वतःला टॉप फ्लोअरवर आयसोलेट केले आहे. मी 25 किंवा 26 मे ला पुन्हा एकदा चाचणी करणार आहे, असेही किरण कुमार म्हणाले आहेत. हे देखील वाचा- अभिनेता सोनू सूद याने स्थलांतरित कामगारांना घरी परतण्यासाठी बसची व्यवस्था केल्याने महाराष्ट्र मंत्री जयंत पाटील यांच्याकडून कौतुक

यापूर्वी चित्रपट निर्माते करीम मोरानी आणि त्यांच्या दोन मुली, बॉलीवुड सिंगर कनिका कपूर, पूरब कोहली, ऍक्टर फ्रेडी दारूवालाचे वडील, ऍक्टर सत्यजीत दुबेच्या आईसह बोनी कपूर आणि फराह अली खानच्या घरात काम करणाऱ्या नोकरालाही कोरोनाची लागण झाली आहे.