Representational Image | (Photo Credits: PTI)

महाराष्ट्रात नांदेड (Nanded मधील उमरी (Umri) गावामध्ये एका साधूचा मृतदेह त्यांच्या आश्रमामध्ये आढळून आल्याचं वृत्त ANI या वृत्तसंस्थेने दिले आहे. दरम्यान ही घटना शनिवार (23 मे) च्या रात्रीची असल्याचं सांगत या घटनेचा अधिक तपास सुरू असल्याची माहिती नांदेड सुपरीटेन्डंट ऑफ पोलिस विनय कुमार मगर (Vijaykumar Magar) यांनी दिली आहे.  साधूच्या हत्येचं नेमकं कारण अद्याप समजू शकलेले  नाही. त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून त्याचा रिपोर्ट  आल्यानंतरच मृत्यूचं कारण स्पष्ट होईल.  घटनास्थळी पोलिस पोहचले असून अधिक तपास सुरू आहे.

दरम्यान महिन्यापूर्वीच पालघरमध्ये दोन साधू आणि एका ड्रायव्हरची हत्या झाल्याची बाब समोर आली होती. 16 एप्रिलच्या या पालघर मॉब लिंचिंगच्या घटनेनंतर महाराष्ट्रासह सारा देश हादरला होता. पोलिस खात्यानेही चौकशी करून सुमारे 160 जणांना पालघर हत्याकांडाप्रकरणी सीआयडी कोठडीमध्ये ठेवले आहे. दरम्यान पालघर मध्ये नुकतीच दत्तात्रय शिंदे (Dattatreya Shinde) यांच्याकडे पालघर जिल्ह्याचे नवे पोलीस अधीक्षक म्हणून जबाबदारी दिली आहे.

ANI Tweet

दरम्यान महाराष्ट्रातील या दोन घटनांसोबतच उत्तर प्रदेशात बुलंदशहर येथील मंदिरातील साधुंची गळा दाबुन हत्या केल्याचीही घटना एप्रिल 2020 मध्ये समोर आली होती. हत्येपूर्वी काही दिवस या पुजाऱ्यांकडील चिमटा काही व्यसनींनी पळवून नेला होता या प्रकारची तक्रार करताच त्या व्यसनींनी पुजाऱ्यांचा गळा दाबून अत्यंत निर्घृण पद्धतीने त्यांची हत्या केल्याची बाब प्राथमिक माहितीमधून समोर आली होती.