पालघर जिल्ह्यासाठी दत्तात्रय शिंदे यांची नवे पोलीस अधीक्षक म्हणून नियुक्ती
Maharashtra Police | (File Photo)

महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यातील तिहेरी हत्यांकाड प्रकरणानंतर जवळजवळ दीड महिन्यानंतर राज्य सरकारने एक मोठी कारवाई केली आहे. शनिवारी महाराष्ट्र सरकाने पालघरचे एसीपी गौरव सिंह यांची बदली केली आहे. तर गौरव सिंह यांची बदली केल्यानंतर त्या जागी आता दत्तात्रय शिंदे यांची पालघर जिल्ह्याचे नवे पोलीस अधीक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. यापूर्वी गौरव सिंह यांना राज्यातील गृह विभागाकडून तातडीच्या सुट्टीवर पाठवण्यात आले होते. आता गौरव सिंग यांच्या नव्या नियुक्तीबाबत त्यांना प्रतिक्षेत ठेवण्यात आले आहे. पालघर मधील दोन साधू आणि त्यांच्या ड्रायव्हरच्या हत्येप्रकरणी सीआयडीकडून करण्यात येणारी तपासणी प्रलंबित होती. त्याचसोबत पालघर डीवायएसपी विक्रांत देशमुख त्यांच्या अनुपस्थित कार्य करत होते.

गृह विभागाकडून जाहीर करण्यात आलेल्या आदेशानुसार असे सांगण्यात आले आहे की, वरिष्ठ आयपीएस अधिकारी दत्तात्रय शिंदे जे सध्या महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ, मुंबई येथे कार्यरत आहेत. परंतु आता गौरव सिंह यांच्या जागी पालघरचे नवे पोलीस अधिक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. पालघर मॉब लिंचिंग प्रकरणी महाराष्ट्र सरकारने स्थानिक पोलिसांकडून हे प्रकरण सीआयडीकडे सोपवले होत. तर पोलिसांची चुक लक्षात येता आयईजी, कोकण रेंज, निकेत कौशिक अंतर्गत तपास सुरु करण्यात आला होता.(Maharashtra Police: कोरोनावर मात करुन ड्युटीवर रुजू झालेल्या महाराष्ट्र पोलिसांचा प्रेरणादायी व्हिडिओ नक्की पाहा, जनतेला देतायत मोलाचा संदेश)

या प्रकरणी कासा पोलीस स्थानाकातील पाच अधिकारी आणि कॉन्स्टेबल यांचे निलंबन करण्यात आले होते. तसेच 35 कॉन्स्टेबल यांची विविध जिल्ह्यातील पोलीस स्थानकात नियुक्ती करण्यात आली. पालघर मॉब लिंचिंग घटनेनंतर सामान्य नागरिकांच्या सुरक्षिततेबाबत प्रश्न उपस्थितीत करत सरकावर टीका करण्यात आली होती. या महिन्याच्या सुरुवातीला राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी तपासाचा आढावा घेण्यासाठी कासा पोलीस स्थानकाला भेट दिली होती. तसेच स्थानिक सरपंच, आमदार आणि अन्य जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठक सुद्धा पार पाडली होती.