Nana Patole (Photo Credit: Twitter)

आमदार रमेश लटके यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर भाजपने उमेदवार देऊ नये. ऋतुजा लटके (Rutuja Latke) यांना विधानसभेवर बिनविरोध पाठवावे, अशी भूमिका महाराष्ट्र नवनिर्माण सेना (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी घेतली आहे. या निवडणुकीबाबत एक अनोखी भुमिका घेत देवेंद्र फडणवीसांना (Devendra Fednavis) पत्र लिहलं आहे. तसेच राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वोसर्वे शरद पवार (Sharad Pawar) यांनी देखील राज ठाकरें प्रमाणेच अंधेरी पोट निवडणुक (Andheri East By Election) ही बिनविरोध व्हावी अशी प्रतिक्रीया नोंदवली आहे. तर राज ठाकरेंसह (Raj Thackeray) शरद पवारांच्या या प्रतिक्रीये नंतर भाजप काय भुमिका घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. तरी संबंधीत बाबींवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना (Devendra Fadnavis) विचारलं असता त्यांनी पक्षश्रेष्ठीसह शिंदे गटाबरोबर चर्चा करुन निर्णय घेवू असं मत व्यक्त केलं आहे.

 

संबंधीत घडामोडींवर आता महाराष्ट्र कॉग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी प्रतिक्रीया दिली आहे. अंधेरी पोटनिवडणूक बिनविरोध झाली तर त्याचा आम्हाला काही विरोध नाही. बाकी जनता समजदार आहे." नाना पटोलेंच्या या सुचक विनाधानाची चर्चा महाराष्ट्रातील राजकीय (Maharashtra Politics) वर्तुळात होत आहे. तरी भाजपची भुमिका अंधेरी पोटनिवडणुकीसाठी अत्यंत महत्वाची असणार आहे. (हे ही वाचा:- Andheri East Assembly Bypoll: लढायचं की मागे फिरायचं? देवेंद्र फडणवीस यांना सर्वाधिकार, अंधेरी पोटनिवडणुकीवरुन भाजपची हायहोल्टेज बैठक)

 

पण शिंदे आणि ठाकरे या दोन्ही गटासाठी ही फक्त निवडणुक नसुन ती आता प्रतिष्ठेची लढत झाली आहे.  तरी या निवडणुकीत सामना डायरेक्ट शिंदे विरुध्द ठाकरे असा होणार नसुन महाविकास आघाडी (Maha Vikas Aghadi) विरुध्द भाजप (BJP) असा होणार आहे. तयार राज ठाकरेंच्या या पत्रानंतर तसेच शरद पवार (Sharad Pawar), नाना पटोले (Nana Patole) यांच्या सुचक वक्तव्यानंतर भाजप काय भुमिका घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.