Dog (Photo Credit: Pexels)

नागपूर (Nagpur) महापालिकेच्या हद्दीत भटक्या आणि बेवारस कुत्र्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. तसेच याबाबतीत नागरिकांच्या वारंवार येणाऱ्या तक्रारीतही वाढ होऊ लागल्या आहेत. यावर उपाय योजना म्हणून नागपूर महापालिकाने नवे धोरण आणण्याचा विचार केला आहे. नवीन धोरणानुसार एका घरात दोन पेक्षा अधिक कुत्रे पाळता येणार नसल्याचे महापालिकेने सांगितले आहे. लवकरच नव्या धोरणाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. मात्र, प्राणी प्रेमी पालिकेच्या या निर्णयाला विरोध करण्याची शक्यता आहे.

नागपूर शहरात भटक्या कुत्र्यांच्या संख्यात वाढ होऊ लागली आहे. यामुळे नागरिकांचा त्रास वाढला आहे. तसेच नागरिकांना भटक्या कुत्र्यांमुळे अधिक मनस्ताप होत आहे. नागपूर शहरात गेल्या काही दिवसांत कुत्रे चावण्याच्या तक्रारीत अधिक वाढ झाली आहे. महत्वाचे म्हणजे, अनेकांना कुत्रे पाळण्याची आवड असते. मात्र, काही जण एक नाही तर, 2- 3 कुत्रे पाळतात. ज्यावेळी या कुत्र्यांचे वय वाढते किंवा त्यांचा इतर कोणताही आजार जडल्यास त्यांनाही भटक्या कुत्र्याप्रमाणे सोडले जाते. एवढेच नव्हेतर, अनेक ठिकाणी भटकी कुत्री अपघाताला कारणीभूत देखील ठरतात. याशिवाय, घरगुती पाळीव कुत्र्यांना त्यांचे मालक रस्त्यावर घेऊन फिरतात, त्यामुळे त्यांच्या ओरडण्याच्या आवाजाने नागपूरकर हैराण झाले आहेत. अशा प्रकारच्या अनेक तक्रारी महापालिकेकडे आल्या आहेत. यावर नियंत्रण आणण्यासाठी महापालिका नवे धोरण आमलात आणण्याचा तयारीत आहे, अशी माहिती टीव्ही9ने दिली. हे देखील वाचा-मराठी शाळेत शिकल्याने मुंबई महापालिकेने नोकरी अर्ज नाकारला

नागपूरात भटक्या कुत्र्यांचा हैदोस पाहायला मिळत आहे. यावर महापालिकेने उपाय योजना म्हणून नस बंदीचा कार्यक्रम आखला. मात्र, त्याचा पाहिजे तसा फायदा झाला नाही.यामुळे एका मालकाला आपल्या घरात दोन पेक्षा जास्त कुत्री पाळता येणार नाहीत. या धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी प्राथमिक तयारी केली असून त्याला लवकरच मंजुरी देण्यात येणार आहे.