मराठी शाळेत शिकल्याने मुंबई महापालिकेने नोकरी अर्ज नाकारला
File image of BMC headquarters | (Photo Credits: Facebook)

मुंबईतील महापालिकेतील एका धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्यानुसार कर्मचाऱ्यांना मराठी शाळेत शिकल्याने त्यांना नोकरी महापालिकेने नाकारली असल्याचे सत्य समोर आले आहे. महापालिकेच्या या अजब कारभारावर संतापासह प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे. एका कर्मचाऱ्यालाच नव्हे तर अन्य 102 जण सुद्धा मराठी शाळेत शिकल्याने त्यांना नोकरीस अपात्र ठरवण्यात आले आहे.

पवित्र पोर्टलच्या माध्यमातून महापालिकांच्या शाळेत शिक्षक पदासाठी निवड करण्यात येणार होती. त्यासाठी परिक्षासुद्धा घेण्यात आल्यानंतर यामध्ये शिक्षकांची निवड इंग्रजी माध्यमासाठी सुद्धा करण्यात आली. परंतु काही उमेदवारांचे शिक्षण 10 वी पर्यंत मराठी माध्यमातून झाल्याने त्यांना नोकरची संधी महापालिकेने नाकाली आहे. तसेच याबाबत स्पष्टीकरण देताना असे सांगण्यात आले की, उमेदवार मराठी माध्यमातून शिकल्याने त्यांना इंग्रजी माध्यमातील शिक्षक पदासाठी नाकारण्यात येत आहे.(कल्याण-डोंबिवली पाणी महागणार? प्रस्तावावर शिक्कामोर्तब झाल्यास पाणीपट्टी दरात होणार दुपटीने वाढ)

पण ज्या शिक्षकांना नोकरीसाठी नाकारण्यात आले आहे त्यांचे पुढील पदव्युत्तर शिक्षण हे इंग्रजी माध्यमातून झालेले आहे. उलट ज्या शिक्षकांचे प्राथमिक, माध्यमिक शिक्षण हे इंग्रजीमधून झाले आहे त्यांची तातडीने शिक्षकपदासाठी निवड करण्यात आली आहे. यामुळे आता मराठी शाळेत शिकले म्हणून त्यांना नोकरी नाही का असा सवाल उपस्थित केला जात आहे.