नागपूर: गाडीचा वेग, नाहक हॉर्न वाजवणे बेतले जीवावर, अपघात नव्हे तर जमावानेच केली तरुणाची हत्या
Murder | Representational Image | (Photo Credits: stux/Pixabay)

नागपूर (Nagpur) मध्ये शांतीनगर मधील नालंदा चौकात वेगाने वाहन चालवणे एका 32 वर्षीय युवकाच्या जीवावर बेतले आहे. आश्चर्य म्हणजे या तरुणाच्या गाडीचा अपघात होऊन नव्हे तर त्याचे ड्रायव्हिंग पाहून संतप्त जमावाने त्याची हत्या केली आहे. आशिष देशपांडे (वय 32, नालंदा चौक),असे मृताचे नाव आहे. दरम्यान, बेकायदेशीरपणे जमाव जमवून हत्या केल्याप्रकरणी शांतीनगर पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेत पाच जणांना अटक केली आहे. सूरज मेश्राम, निखिल मेश्राम, रॉकी मेश्राम, आशू मेश्राम व रॉकी,अशी अटकेतील तर निखिल हांडा असे फरार आरोपीचे नाव आहे. मृत आशिष याच्याविरुद्ध मारहाण व शस्त्र बाळगण्यासह सात गुन्हे दाखल आहेत. मुंबई: विक्रोळी मध्ये 22 वर्षीय डिलिव्हरी बॉयची चाकूने भोकसून हत्या; आरोपी फरार; पोलीस तपास सुरु

मटाच्या वृत्तानुसार, आशिष देशपांडे हा भरवाध गाडी चालवत जोरजोराने हॉर्न वाजवत होता. त्यामुळे येथील महिलांना त्रास होत होता. महिलांनी त्याला समजावण्याचा प्रयत्न केला पण त्याने महिलांसोबत वाद घातला. यानंतर रात्री पुन्हा तो परिसरात जोरजोराने हॉर्न वाजवायला लागला. येथील महिलांनी त्याला परत एकदा समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याने पुन्हा वाद घातला. त्यामुळे संतप्त झालेल्या परिसरातील सहा युवकांनी लोखंडी रॉड, काठी व फरशीने त्याच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात गंभीर जखमी होऊन आशिषचा मृत्यू झाला.

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलिसाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. यानंतर आशिषचा मृतदेह मेयो हॉस्पिटलकडे रवाना करण्यात आला. तसेच, बेकायदा जमाव करून हत्या केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करीत पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे.