मुंबई: विक्रोळी मध्ये 22 वर्षीय डिलिव्हरी बॉयची चाकूने भोकसून हत्या; आरोपी फरार; पोलीस तपास सुरु
Image used for represenational purpose (File Photo)

विक्रोळी (Vikhroli)  मध्ये काल 3 ऑगस्ट रोजी रात्री 10 . 15 च्या सुमारास आपली ड्युटी संपवून घरी परतणाऱ्या एका हॉटेलच्या डिलिव्हरी बॉय वर दोन अज्ञातांकडून हल्ला करण्यात आला, ज्यामध्ये 22 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याचे समजत आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, हा तरुण आपले काम संपवून घरी जात असताना दोन हल्लेखोरांनी त्याच्यावर चाकूने वार केले. यामुळे या तरुणाचा जागच्या जागीच मृत्यू झाला. याबाबत माहिती मिळ्तचह पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले मात्र तोपर्यंत आरोपी हल्लेखोर पळून गेले होते. हा प्रकार घडण्यांध्ये मृत तरुण आणि आरोपींमध्ये काहीश्या कारणावरून वाद झाला होता असा अंदाजही पोलिसांकडून वर्तवण्यात येत आहे.

ANI ट्विट

हे ही वाचा -बीड: केवळ 300 रुपयांच्या हिशोबासाठी डोक्यात वीट घालून पत्नीची हत्या

प्राप्त माहितीनुसार तूर्तास पोलिसांनी फरार आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून याप्रकरणी सखोल तपास सुरु आहे. यासाठी परिसरातील सीसीटीव्हीही कॅमेराचे फुटेज तपासणी करण्यात येणार आहे.