Nagpur Mercedes Crash: नागपूर हिट अँड रन केस प्रकरण; मर्सिडीजने चिरडून दोघांचा जीव घेणाऱ्या महिलेची सुटका
कोर्ट । ANI

Nagpur Mercedes Crash: नागपुरमधील हिट अँड रन केस प्रकरणात न्यायालयाने आरोपी महिलेची सुटका केली आहे. पोलिसांनी तांत्रिक बाबी न पाळल्याने न्यायालयाने तिची अटकच बेकायदेशीर ठरवत ताशेरे ओढले आहेत. 24 फेब्रुवारी 2024 च्या रात्री नागपूरमध्ये हिट अँड रनची घटना घडली होती. शहरात मध्यरात्री क्लबमधून घरी जात असताना भरधाव मर्सिडिज कारने(Nagpur Mercedes Accident)दोन तरुणांना चिरडले होते. या दुर्घटनेत हुसेन गुलाम मुस्तफा आणि मोहम्मद अतिक या दोन्ही तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. या घटनेनंतर आरोपी महिला रितिका मालू ( Ritika Maloo)फरार झाली होती. पोलिसांकडून तिचा शोध सुरू होता. मात्र, काल अचानक मंगळवारी महिलेने पोलिसांसमोर आत्मसर्पण केले होते.

याप्रकरणी कारचालक महिला रितिका मालूवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र हा अपघात झाल्यापासून रितिका मालू फरार होती. पोलिसांकडून तिला शोधता आले नाही. दोन दिवसांपूर्वी म्हणजेच १ जुलै रोजी आरोपी रितिका मालूने आत्मसमर्पन केले होते. त्यानंतर काल तिची न्यायालयाने सुटकाही केली. (हेही वाचा:Nagpur Mercedes Crash: नागपूर मर्सिडीज अपघात प्रकरणातील चालक महिलेचे पोलिसांसमोर आत्मसमर्पण; याआधी कोर्टाने नाकारला होता अटकपूर्व जामीन)

पोलिसांनी तांत्रिक बाबी न पाळल्याने न्यायालयाने तिची अटकच बेकायदेशीर ठरवत पोलिसांवर ताशेरे ओढले. तसेच या प्रकरणात कलमवाढ करण्याअगोदर पोलिसांनी प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी न्यायालयाची परवानगी घेतली नव्हती. या कारणामुळे रितिका मालूची प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी न्यायालयाने सुटका करण्यात आली आहे.