Nagar-Aurangabad Road Accident: नगर-औरंगाबाद मर्गावर अपघात; 5 ठार, सर्व मृत जालना येथील
Accident Representational image (PC - PTI)

नगर औरंगाबाद महामार्गावर (Nagar-Aurangabad Road) झालेल्या अपघातात 5 जण ठार झाले आहेत. आज (22 फेब्रुवारी 2021) पहाटे दोन वाजता हा अपघात (Road Accident) घडला. नेवासा तालुक्यात देवगड फाट्याजवळ लग्झरी बस आणि स्विफ्ट कार यांच्यात झालेल्या धडकेमुळे ही घटना घडली. अपघातातील सर्व जण हे जालना जिल्ह्यातील रहिवासी असल्याचे समजते.

प्राप्त माहितीनुसार, स्वीफ्ट कार (क्रमांक एमएच 21 बीएफ 7178) औरंगाबादहून नगरच्या दिशेने निघाली होती. दरम्यान, दवगड फाट्याजवळ या कारची नगरच्या दिशेने निघालेल्या (एमएच 19 वाय 7123 क्रमांकाच्या एका खासगी ट्रॅव्हलशी जारदार धडक झाली. या धडकेमुळे झालेल्या भीषण अपघातात कारमध्ये असलेले पाचही जण जागीच ठार झाले. कारमधील सर्व मृत हे जालना जिल्ह्यातील असल्याचे समजते.

अपघात इतका भीषण होता की, कारचा जागीच चेंदामेंदा झाला. कार ट्रव्हल्सच्या पुढील भागात जाऊन घुसली. पहाटेची वेळ असल्याे प्रचंड मोठा आवाज झाला. आवाजामुळे परिसरातील नागरिक घटनास्थळी जमा झाले. पहाटेची वेळ असलेल्याने रस्त्यावरील वाहतूकही तुरळकच होती.

अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मदत आणि बचाव कार्य सुरु केले. सर्व जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल केले. परंतू, डॉक्टरांनी जखमींना मृत घोषीत केले.दरम्यान, मृतांची ओळख पटविण्याचे काम सुरु आहे. अपघातामुळे रस्त्यावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. ही वाहतूक आता पूर्ववत करण्यात आली आहे. अपघाताचे कारण मात्र समजू शकले नाही. पोलीस तपास सुरु आहे.