Latur: लातूर शहरात जमिनीखालून आले गूढ आवाज, नागरिकांमध्ये भूकंपाची चर्चा
Mysterious Sound

लातूर शहर (Latur City) आणि परिसरात जमिनीखालून काही गूढ आणि तितकेच रहस्यमय आवाज (Mysterious Sound) आल्याचे वृत्त आहे. आवाज ऐकून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. दरम्यान, हे आवाज आले असले तरी यात भूकंपाची (Earthquake) काही शक्यता असल्याचा कोणताही संकेत मिळाला नसल्याचे अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. अधिकाऱ्यांनी माहिती देताना पुढे सांगितले की, लातूर शहातील विवेकानंद चौक रिसरातन बुधवारी सकाळी 10 आणि 10,45 वाजता हे आवाज आले. ज्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पाहायला मिळाले. काही नागरिकांमध्ये भूकंच्या अफवाही पसरल्या.

एका अधिकाऱ्याने सांगितले की, आवज आल्यानंतर पुढच्या काहीच वेळात स्थानिक प्रशासनाला सतर्क करण्या आले. जिल्हा आपत्ती निवारण विभागाने लातूर शहरासह औराद शहाजनी आणि भूकंपमापन केंद्राला सूचना देण्यात आली. भूकंपमापन केंद्राने भूकंपाबाबत कोणतीही माहिती मिळाली नाही. या आधी 1993 मध्ये लातूर येथील किल्लारी गावात मोठा भूकंप आला होता. ज्यात सुमारे 10,000 नागरिकांचे बळी गेले. होते. (हेही वाचा, Turkey Earthquake : भूकंपातील मृतांची संख्या 40 हजारांवर)

अपत्ती निवारण अधिकारी साकिब उस्मानी यांनी बुधवारी सांगितले की, मराठवाड्यातील अनेक ठिकाणांहून वेळवेळी काही गूढ आवाज आले. सप्टेंबर 2022 मध्ये तीन वळा लातूर जिल्ह्यातील हसोरी, किल्लारी आणि परिसरातील भूभागांतून अशा पद्धतीने आवाज ऐकू आले. अधिकाऱ्यांनी म्हटले की, या वर्षी फेब्रुवारी मध्ये लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील नितूर-दंगेवाडी परिसरात चार वेळा वेगवेगळे आवाज ऐकू आले.