Aurangabad: औरंगाबाद येथील धक्कादायक घटना, अनैतिक संबंधात अडथळा ठरणाऱ्या प्रेयसीच्या पतीचा काढला काटा
Representational Image | (Photo Credits: PTI)

औरंगाबाद (Aurangabad) येथील वैजापूर (Vaijapur) तालुक्यातील खुलताबाद येथील व्यक्तीच्या मृतदेह पोलिसांना आढळून आला होता. या प्रकरणाचा छडा लावण्यात पोलिसांना अवघ्या काही तासांत यश आले आहे. अनैतिक संबंधातून (Immoral Relationship) ही हत्या (Murder) झाल्याचे पोलीस चौकशीतून समोर आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी एका व्यक्तीला अटक केली असून त्याच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात एकच खळबळ माजली आहे. याप्रकरणी स्थानिक पोलीस अधिक चौकशी करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, अण्णा जाधव असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर, काकासाहेब खुटे असे आरोपीचे नाव आहे. अण्णा आणि काकासाहेब या दोघांच्या पत्नी एकमेकींच्या मैत्रिणी होत्या. जाधव यांच्या पत्नी नंदा हिचे काकासाहेबांच्या घरी येणे-जाणे होते. यातूनच नंदा आणि काकासाहेब यांच्यात प्रेमसंबंध जुळले. दरम्यान, अण्णा दारू पिऊन आल्यानंतर नेहमी नंदा हिला मारहाण करत असल्याचे तिने काकासाहेबला सांगितले. त्यानंतर प्रेमात अडथळा ठरणाऱ्या अण्णांचा कायमचा काटा काढण्याचा काकासाहेबने ठरवले. त्यानुसार, अण्णा जाधव याला पाहुण्यांकडे जायचे सांगून काकासाहेबाने त्याला घेऊन निघाला. त्यानंतर त्याला गारज येथे बंद असलेल्या शुगर मिल परिसरात नेऊन काकासाहेबने अण्णा यांना दगडाने मारहाण केली आणि त्यानंतर पट्याने गळा आवळून त्यांनी हत्या केली. हे देखील वाचा- Mumbai Rape: पोटच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी जन्मदात्या पित्याला अटक, मुंबईच्या अंधेरी येथील धक्कादायक घटना

त्यानंतर अण्णा जाधव यांचा मृतदेह वैजापूर तालुक्यातील गारज येथे फेकून दिला. त्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्र फिरवल्यानंतर जाधव यांची ओळख पटली. तसेच काकासाहेब यानेच अण्णा जाधव यांची हत्या केल्याची पोलीस चौकशीतून समोर आले आहे. त्यानंतर पोलिसांनी खाक्या दाखवताच काकासाहेबने हत्येची कबूली दिली.