Mumbai Rape: पोटच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी जन्मदात्या पित्याला अटक, मुंबईच्या अंधेरी येथील धक्कादायक घटना
Image Used for Representational Purpose Only | (Photo Credits: File Image)

देशात महिला अत्याचार आणि अल्पवयीन मुलींवर होणाऱ्या बलात्काराचे (Rape) सत्र थांबायला तयार नाही. देशातील विविध कोपऱ्यातून दररोज हृदय पिळवटून टाकणाऱ्या घटना समोर येत आहेत. अशातच मुंबईच्या (Mumbai) अंधेरी (Andheri) येथून बाप-लेकीच्या नात्याला काळांबा फासणारी घटना उघडकीस आली आहे. या परिसरात राहणाऱ्या एका 38 वर्षीय व्यक्तीने पोटच्या मुलीवर बलात्कार केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. याप्रकरणी स्थानिक पोलिसांनी जन्मदात्या पित्याला अटक केली असून त्याच्याविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात एकच खळबळ माजली आहे.

अंधेरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 23 मे रोजी त्यांना 11 वर्षांच्या मुलीवर तिच्या पित्याने बलात्कार केल्याची तक्रार मिळाली. यानंतर पोलिसांनी त्वरित गुन्हा नोंदवून बलात्कार करणाऱ्या पित्याला अटक केली आहे. पीडिताच्या तक्रारीनुसार, पीडित मुलीवर जानेवारीपासून लैंगिक अत्याचार सुरु होते. संबंधित मुलगी तिच्या 9 वर्षाच्या बहिणीसह वडिलांसोबत अंधेरी परिसरात राहत होती. वडिलांच्या या दुष्कर्मांची भीती बाळगून तिने ही माहिती आपल्या शेजाऱ्यांना सांगितली. त्यानंतर मुलीने शेजाऱ्याच्या मदतीने पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी नराधम वडिलांविरुध्द  आयपीसी आणि पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करून त्याला तोबडतोब अटक केली आहे. हे देखील वाचा- Ulhasnagar: खळबळजनक! उल्हासनगर येथे अवघ्या 20 रुपयांसाठी एका तरुणाची हत्या

एएनआयचे ट्वीट-

अंधेरी येथील घटना ताजी असताना मुंबईच्या चारकोप पोलिसांनी 12 वर्षीय मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी एका 20 वर्षीय तरूणाला अटक केल्याची माहिती समोर आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे, आरोपी हा पीडित मुलीच्या मावशीचा मुलगा आहे. याप्रकरणी आरोपीविरोधात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी पुढील कारवाईला सुरुवात केली आहे.