पालघर (Palghar) मध्ये 8 वर्षीय मुलीची हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर येत आहे. धारदार शस्त्राने वार करत ही हत्या केल्याचे उघड झाले असून खूनी हा मुलीचा नातेवाईक असल्याचे बोलले जात आहे. पालघर जिल्हा ग्रामीण पोलिस नियंत्रण कक्षाच्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, ही घटना डहाणू तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेजवळ सोमवारी दुपारी 1.30 च्या सुमारास ही घटना घडली. त्यानंतर 46 वर्षीय आरोपी फरार झाला आहे. दरम्यान, लैगिंक अत्याचारानंतर हत्या करण्यात आली आहे क? हे पोस्टमार्टम रिपोर्ट आल्यानंतरच स्पष्ट होईल.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने मुलीवर धारदार शस्त्राने वार केले. त्यामुळे ती गंभीररीत्या जखमी झाली. यावेळेस बाजूने जाणाऱ्या व्यक्तीने मुलीवर हल्ला होत असल्याचे पाहिले आणि तिला वाचवण्याचा प्रयत्न केला. तेव्हा आरोपीने त्या व्यक्तीवर देखील हल्ला केला आणि त्यानंतर तेथून फरार झाला. (माता न तू वैरिणी! सुया टोचून साडेतीन वर्षांच्या मुलीची हत्या; आई व तिच्या प्रियकराला सुनावली फाशीची शिक्षा)
घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर पीडितेला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र तिथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. त्यानंतर तिचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठण्यात आला आहे. (Meerut: बायकोचा माहेरहून परतण्यास नकार, संतप्त नवऱ्याकडून पोटच्या दोन अल्पवयीन मुलीची हत्या)
दरम्यान, पीडितेला वाचवण्याचा प्रयत्न करणारा व्यक्ती देखील गंभीररीत्या जखमी झाला असून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. डहाणू पोलिसांनी भारतीय दंड संहिता कलम 302 आणि 307 अंतर्गत गुन्हा दाखल केला असून फरार आरोपीचा शोध सध्या सुरु आहे.