West Bengal: माता न तू वैरिणी! सुया टोचून साडेतीन वर्षांच्या मुलीची हत्या; आई व तिच्या प्रियकराला सुनावली फाशीची शिक्षा
Death penalty. (Photo Credits: Pixabay, Open Clip Art)

पश्चिम बंगाल (West Bengal) जिल्ह्यातील पुरुलिया (Purulia) सुई केसमध्ये, तीन वर्षांच्या मुलीची सुई टोचून हत्या केल्याप्रकरणी आई मंगला आणि तिचा प्रियकर सनातन यांना पुरुलिया न्यायालयाने फाशी देण्याचे आदेश दिले आहेत. पुरुलिया न्यायालयाने या दोघांनाही मंगळवारी फाशीची शिक्षा सुनावली. जुलै 2016 च्या शेवटच्या आठवड्यात ही घटना घडली होती. एका मुलीला पुरुलियाच्या सदर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते, पण जेव्हा हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी मुलीची तपासणी केली तेव्हा त्यांना धक्का बसला. मुलीच्या संपूर्ण शरीरावर जखमा आढळल्या, छातीजवळ सूज आली होती, हात-पाय सुजले होते, अगदी गुप्तांगांवर खोल जखमा झाल्या होत्या.

त्या घटनेनंतर, 2016 मध्ये, मुलीची आई मंगला आणि मंगलाचा प्रियकर सनातन उत्तर प्रदेशात लपून बसले होते. नंतर त्यांना अटक करण्यात आली. सोमवारी न्यायालयाने या प्रकरणी निकाल राखून ठेवला होता. न्यायालयाने म्हटले की, आईची कुशी ही मुलासाठी सर्वात सुरक्षित जागा मानली जाते, मात्र इथे एका साडेतीन वर्षीय मुलीला आपल्या आईपासून धोका होता. आईचा प्रियकर मुलीचे लैंगिक शोषणही करायचा. आई म्हणून मंगला आपल्या मुलीचे रक्षण करण्यात अपयशी ठरली म्हणूनच त्यांना ही शिक्षा देण्यात येत आहे.

पुरुलिया पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी 12 सप्टेंबर 2016 रोजी न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते. चार वर्षांच्या प्रदीर्घ सुनावणीनंतर शुक्रवार 18 सप्टेंबर 2021 रोजी दोघांनाही पुरुलिया जिल्हा न्यायालयात रमेश कुमार प्रधानयांच्यासमोर दोषी ठरवण्यात आले. सनातनवर 2012 POCSO कायद्याचे कलम 37, कलम 327 अंतर्गत बालकांवर बलात्कार, शारीरिक आणि मानसिक अत्याचार, कलम 306 अन्वये खुनाचा प्रयत्न आणि कलम 302 अन्वये खुनाचा आरोप होता. (हेही वाचा: Uttar Pradesh Rape: धक्कादायक! धावत्या बसमध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्कार, कंडक्टरला अटक)

मंगलाला आपली मुलगी आवडत नव्हती. सनातनसोबत तिने मुलीला सेक्स टॉय म्हणून वापरले आणि काळी जादूचा अभ्यास केला. चौकशी दरम्यान पोलिसांना ही सर्व माहिती मिळाली. मुलीचा एक्स-रे काढला गेला होता आणि त्या एक्स-रेमध्ये तिच्या शरीरात सात मोठ्या सुया आढळून आल्या. या अल्पवयीन चिमुरडीवर मुलावर लैंगिक अत्याचारही झाले होते.