Uttar Pradesh Rape: धक्कादायक! धावत्या बसमध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्कार, कंडक्टरला अटक
Rape Case | (Photo credit: archived, edited, representative image)

देशात महिला अत्याचार आणि अल्पवयीन मुलींवर होणाऱ्या बलात्काराच्या (Rape) घटना सुरुच आहेत. देशातील विविध कोपऱ्यातून दररोज हृदय पिळवटून टाकणाऱ्या घटना उघडकीस येत आहेत. यातच धावत्या बसमध्ये एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी उत्तर प्रेदश (Uttar Pradesh) पोलिसांनी बस कंडक्टरला (Bus Conductor) अटक केल्याची माहिती समोर आली आहे. पीडित मुलगी आपल्या मावशीसह दिल्लीच्या बदरपुर (Badarpur, Delhi) येथून शिकोहाबाद (Shikohabad) येथे जात असताना ही घटना घडली आहे. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात एकच खळबळ माजली असून पोलिसांनी पुढील चौकशीला सुरुवात केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडत मुलीने तिच्या मावशीसह सोमवारी रात्री 11. 30 वाजता दिल्लीच्या बदरपुर येथून शिकोहाबादला जाण्यासाठी बस पकडली होती. दरम्यान, बस सुरु झाल्यानंतर सर्व प्रवासी झोपले. त्यानंतर बसमधील सर्व लाईट बंद करण्यात आल्या. त्यावेळी आरोपी कंडक्टर पीडत मुलीच्या जवळ आला. पीडिताची मावशी झोपली असल्याचा गैर फायदा घेत कंडक्टरने पीडित मुलीला बसच्या पाठीमागच्या सीटवर घेऊन गेला आणि तिचे तोंड दाबून तिच्यावर बलात्कार केला. हे देखील वाचा- Murder Rate: हत्येच्या दराबाबत नागपूर, पाटणा ठरले देशात अव्वल; NCRB रिपोर्टमधून धक्कादायक बाब समोर

दरम्यान, पीडिताने आपल्यासोबत घडलेला सर्व प्रकार तिच्या मावशीला सांगितला. त्यानंतर शिकोहाबाद पोहचल्यानंतर बस चालक आणि कंडक्टरने पीडित मुलगी आणि तिच्या मावशीला बसमधून खाली उतरवले. त्यावेळी पीडिताच्या मावशीने तिथे गोंधळ घालत तिच्या घरातील सदस्यांना त्या ठिकाणी बोलावून घेतले. तसेच आपल्या बहिणीच्या मुलीवर बसच्या कंडक्टरने बलात्कार केल्याचे तिने सांगितले. त्यानंतर स्थानिक पोलिसांन घटनास्थळी धाव घेतली.

पीडिताच्या मावशीने दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी बस जप्त केली आहे. तसेच बसच्या कंडक्टरला अटक केली आहे. दरम्यान, पोलिसांनी पीडित मुलीची वैद्यकीय तपासणी करण्यासाठी तिला जवळच्या शासकीय रुग्णालयात पाठवले आहे. वैद्यकीय अहवालानंतरच पुढील कारवाई जाणार असल्याची माहिती मिळत आहे.