Sudhir Mungantiwar (Photo Credit - Twitter)

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटातील 16 आमदारांच्या अपात्रता नोटीस प्रकरणात सर्वोच्च  न्यायालयाचा (SC) दिलासा मिळाल्याने शिंदे गोटात उत्साहाचे वातावरण आहे. त्याचबरोबर भाजपच्या गोटातही खळबळ उडाली आहे. विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या सागर बंगल्यावर सोमवारी (27 जून) सायंकाळी भाजप कोअर कमिटीची बैठक संपली. या बैठकीनंतर सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी माध्यमांशी संवाद साधताना भाजप सध्या वेट अँड वॉचच्या भूमिकेत असल्याचे सांगितले. एकनाथ शिंदे गटाकडून अद्याप कोणताही प्रस्ताव आलेला नाही. जर काही डिलिव्हरी असेल तर त्याचा विचार केला जाईल. सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, भाजपच्या कोअर कमिटीत शिवसेनेतील फूट आणि राज्यातील राजकीय परिस्थितीवर चर्चा झाली. राज्यातील भविष्यातील वाटचाल लक्षात घेऊन भाजप आपली भूमिका स्पष्ट करेल. सध्या राजकीय परिस्थिती लक्षात घेता भाजप वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहे.

दरम्यान, भाजपच्या सर्व आमदारांना बुधवारपर्यंत मुंबईत येण्याचे आदेश देण्यात आले आहेत. भाजपच्या सर्व 106 आमदार आणि समर्थक अपक्ष आमदारांना मुंबईत येण्यास सांगण्यात आले आहे. मुंबईत उपस्थित असलेल्या आमदारांना मुंबईतच राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. (हे देखील वाचा: Maharashtra Political Crisis: 'बाळासाहेब ठाकरेंच्या हिंदुत्वाचा विजय', एकनाथ शिंदेच नवीन ट्विट)

तर दुसरीकडे केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी राज्यात लवकरच भाजपचे सरकार स्थापन होणार असल्याचे संकेत दिले आहेत. रावसाहेब दानवे यांनी म्हटलं आहे की, ते केवळ फक्त दोन-तीन दिवस विरोधी पक्षाच्या भूमिकेत आहेत. बहुमताचा आकडा आज होतो की नाही हे सांगता येणार नाही, पण आजच्या परिस्थितीत भाजप सत्ता स्थापन करण्याच्या स्थितीत नाही. त्यामुळे यावेळी आपण फक्त वाट पाहण्याच्या भूमिकेत आहोत.