मुंबई महापालिकेने अलीकडेच खड्डे दाखवा आणि 500 रुपयांचं बक्षीस मिळवा हा उपक्रम सुरु केला. या उपक्रमाअंतर्गत, मुंबईतील दादर विभागात राहणाऱ्या एका तरुणाने खड्डे दाखवून हजारोंची कमाई केली आहे.
प्रथमेश चव्हाण असं त्या मुलाचं नाव असून त्याने मुंबई महापालिकेला (BMC Pothole complaints) खड्डे दाखवून तब्बल 5 हजार रुपयांचं बक्षीस मिळवलं आहे. प्रथमेश दादरमधील शिवाजी पार्क परिसरातील रहिवाशी आहे.
मुंबई महापालिकेच्या खड्डे दाखवा आणि 500 रुपयांचं बक्षीस मिळवा या मोहिमेअंतर्गत थमेशने सर्वाधिक 50 तक्रारी दाखल केल्या होत्या.
काय आहे महापालिकेची मोहीम?
महापालिकेने सुरु केलेल्या या मोहिमेच्या नियमांनुसार, खड्ड्याची तक्रार दाखल झाल्यानंतर 24 तासांच्या आत ते बुजवणे आवश्यक आहे. तसं न झाल्यास तक्रारदाराला 500 रुपये बक्षीस महापालिकेला द्यावं लागणार आहे.
या योजनेत सहभागी होण्यास अटी
-खड्डा पालिकेच्या हद्दीतील असावा
-खड्डा किमान 1 फुट लांब आणि तीन इंच खोल असावा
-या योजनेसाठी ‘mybmcpotholefixitl’ या अॅपवर तक्रार नोंदवावी लागेल.
-तक्रार नोंदवून 24 तासांत खड्डा बुजवला नाही तरच ही बक्षिसाची रक्कम मिळणार आहे.
विशेष म्हणजे प्रथमेशने दाखवलेले 10 खड्डे महापालिकेने 24 तासांच्या आत बुजवले. मात्र अन्य खड्डे बुजवता न आल्याने, महापालिकेला त्याला 5 हजार रुपयांचं बक्षीस द्यावं लागलं.
मुंबई: रस्त्यावरील एक खड्डा बुजवण्यासाठी 17 हजार रुपयांचा खर्च, माहिती अधिकारात उघड
यातही आश्चर्याची बाब म्हणजे ‘मायबीएमसी पॉटहोल फिक्सीट’ या अॅपद्वारे प्रथमेशने आजपर्यंत जवळपास 70 तक्रारी केल्या आहेत.