मुंबई: रस्त्यावरील एक खड्डा बुजवण्यासाठी 17 हजार रुपयांचा खर्च, माहिती अधिकारात उघड
प्रातिनिधिक प्रतिमा (Photo credits: Twitter/bhatia_niraj23)

पावसाळ्याचे दिवस सुरु झाले की मुंबईतील रस्त्यांवरील खड्डे पडण्यास सुरुवात होते. या पडेलेल्या खड्ड्यांवरुन रस्त्याचे काम किती योग्यरितीने केले आहे याचा अंदाज येतो. दरवर्षीप्रमाणे यंदासुद्धा ठिकठिकाणी रस्त्यांना खड्डे पडल्याचे चित्र दिसून येत आहे. रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमुळे अनेक दुर्घटना घडल्याचे समोर आले आहे. तरीही महापालिकेने (BMC) मुंबईत फक्त 414 खड्डे बुजवण्याचे काम बाकी असल्याचे स्पष्टीकरण दिले आहे.

मात्र माहिती अधिकारात मुंबईतील एक खड्डा बुजवण्यासाठी 17, 693 रुपये खर्च येत असल्याचे उघड झाले आहे. त्यानुसार गेल्या सहा वर्षात किती खर्च झाला असेल याचा विचार करणे सुद्धा अशक्य आहे. उघड झालेल्या माहितीमध्ये 2013 ते 2019 पर्यंत खड्डे बुजवण्यासाठी किती खर्च आला याबद्दल स्पष्ट करण्यात आला आहे. गेल्या सहा वर्षात एकूण महापालिकेच्या बजेटमध्ये 3981 खड्डे बुजवण्यासाठी 175 करोड 51 लाख 86 हजार रुपयांची तरदूत करण्यात आली होती. त्यानुसार एकूण 4898 खड्डे बुजवले गेले पण त्यासाठी 7 कोटी 98 लाख 7 हजार रुपये खर्च करण्यात आले.(Mumbai Metro 3 च्या डब्ब्यांच्या मॉडेल्सचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून अनावरण)

महापालिकेने या अहवालानंतर प्रत्येक वर्षाला 90 ते 100 खड्डे बुजवले असल्याचा दावा केला आहे. मात्र तरीही रस्त्यांची स्थिती पाहता एवढे कोटी खर्च करुनही जशीच्या तशीच आहे. उघड झालेली ही माहितीनंतर मुंबईतील वॉर्डनुसार याबद्दल सांगितल्यास त्यासाठी किती खर्च करण्यात आला असेल याचा विचारसुद्धा करवत नाही. महापालिकेच्या या प्रकारामुळे भ्रष्टाचार होत असल्याची टीका विरोधी पक्ष आणि आरटीआय कार्यकर्त्यांकडून केली जात आहे.