मुंबईकरांचा प्रवास वेगवान करण्यासाठी लवकरच मेट्रो 3 (Mumbai Metro 3) खुली करण्यात येणार आहे. आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या उपस्थितीमध्ये या प्रकल्पाच्या आणि मुंबई मेट्रोच्या डब्ब्यांचे मॉडेल जाहीर करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या वेळेस मुख्यमंत्र्यांसोबत मुंबई मेट्रो रेल्वे कॉरपरेशनच्या व्यवस्थापकीय संचालक अश्निनी भिडे आणि रेल्वेचे वरिष्ठ अधिकारीदेखील उपस्थित होते.
मेट्रो 3 च्या मार्गिकेला अॅक्वा लाईन असं संबोधित आले आहे. या नावाला साजिशी मेट्रो 3 च्या डब्ब्यांची आंतरिक आणि बाह्य रचना करण्यात आली आहे. यामध्ये 8 डब्ब्यांच्या 31 गाड्यांचा समावेश आहे. मुंबई मेट्रो 3 ही कुलाबा - वांद्रे - सीप्झ दरम्यान धावणार आहे. मुंबई: शिवसेना आमदार तुकाराम काते यांचे चिखलात बसून ठिय्या आंदोलन, मेट्रोच्या कामामुळे होणाऱ्या त्रासाचा निषेध
Mumbai Metro 3 ट्वीट
मेट्रो-३ मार्गिकेस *अँक्वा लाईन* या नावाने संबोधिले जाणार असून नावाला साजेशी डब्यांचे आंतरिक व बाह्य संरचना राहणार आहे. मुं.मे.रे.कॉ @alstomIndia कडून तब्बल ८ डब्याच्या ३१ गाड्या घेणार आहेत. pic.twitter.com/uqj25ZHr1Z
— MumbaiMetro3 (@MumbaiMetro3) August 16, 2019
मेट्रो 3 मध्ये एसी, एलसीडी स्क्रिन्स, डिजिटल मॅप इंडिकेटर, फायर एक्सटिंगव्हिशर, स्मोक डिटेक्टर, व्हॉईस कम्युनिकेटर या आपत्कालीन स्थितीमध्ये मदतीला येणार्या काही सोयी देण्यात आल्या आहेत. तसेच दिव्यांगासाठी खास व्हिलचेअर भाग राखीव ठेवण्यात आला आहे.
काही दिवसांपूर्वीच कुलाबा-वांद्रे-सीप्झ या मेट्रो 3 च्या पहिल्या भुयारी मार्गाचे भुयारीकरण काही महिन्यांपूर्वी पूर्ण झाले. या मार्गात आझाद मैदान ते मुंबई सेंट्रल असे 3.814 किमीचे भुयारीकरण पूर्ण करण्यात आले. 4 डिसेंबर 2017 पासून सुरु करण्यात आलेले हे काम 20 महिन्यांच्या कालावधीत पूर्ण करण्यात आले होते.