Coronavirus in Mumbai: मुंबईमध्ये आज कोरोना विषाणूच्या 2,172 रुग्णांची नोंद; एकूण संक्रमितांची संख्या 1,65,287 वर
Medical workers (Photo Credits: IANS)

गेल्या काही दिवसांपासून मुंबईमधील (Mumbai) कोरोना विषाणू (Coronavirus) रुग्णांचा आकडा हजाराच्या वर जात आहे. आज कोरोना विषाणूच्या 2,172 रुग्णांची नोंद झाली आहे. यासह एकूण संक्रमितांची संख्या 1,65,287 झाली आहे. आज शहरामध्ये कोरोना विषाणूचे 1,132 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहे. आतापर्यंत एकूण 1,29,244 रुग्ण बरे झाले आहेत. सध्या मुंबईमध्ये 27,626 सक्रीय रुग्णांवर उपचार सुरु आहेत. आज मुंबईमध्ये कोरोनाच्या 44 रुग्णांचा मृत्यू झाला असून, आतापर्यंत 8,064 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. बीएमसीने (BMC) याबाबत माहिती दिली आहे.

आज मृत्यू झालेल्या रुग्णांपैकी 26 रुग्णांना काही दीर्घकालीन आजार होते. त्यातील 30 रुग्ण पुरुष व 14 रुग्ण महिला होत्या. 3 जणाचे वय 40 वर्षा खाली होते, 34 जणांचे वय 60 वर्षा वर होते. तर उर्वरित 7 रुग्ण 40 ते 60 वर्षा दरम्यान होते. मुंबई जिल्ह्यातील बरे झालेल्या रुग्णांचा दर 78 टक्के झाला आहे. 4 सप्टेंबर ते 10 सप्टेंबर पर्यंत मुंबईतील एकूण कोविड वाढीचा दर 1.20 टक्के आहे. 10 सप्टेंबर 2020 पर्यंत झालेल्या कोविडच्या एकूण चाचण्या या 8,87,274 इतक्या आहेत. मुंबईमधील रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी कमी होऊन 58 दिवस झाला आहे. (हेही वाचा: 'आयसीएमआर'च्या सीरो सर्वेक्षणामधून मोठा खुलासा; मेच्या सुरुवातीपर्यंत देशात तब्बल 64 लाख लोक Coronavirus संक्रमित)

पीटीआय ट्वीट -

प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून, 10 सप्टेंबर नुसार मुंबईमधील सक्रिय कंटेनमेंट झोन (झोपडपट्ट्या आणि चाळी) ची संख्या 542 इतकी आहे, तर सक्रिय सीलबंद इमारती या 7,217 इतक्या आहेत. दरम्यान, महाराष्ट्रामध्ये आज दिवसभरात 24,886 नवे कोरोना व्हायरस संक्रमित आढळले, तर कोरोना व्हायरस संक्रमित 393 जणांचा मृत्यू झाला. यासह राज्यातील एकूण कोरोना व्हायरस संक्रमितांची संख्या 10,15,681 लाख इतकी झाली आहे. आतापर्यंत 7,15,023 जणांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.