मुंबईकरांना वर्सोवा-अंधेरी या मार्गाने प्रवास करण्यासाठी सरकारने मेट्रोची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. प्रत्येक दिवसाला हजारोंच्या संख्येने नागरिक मेट्रोने प्रवास करतात. प्रवाशांना मेट्रोने प्रवास करण्यासाठी 45 वेळा फेऱ्यांसाठी महिन्याभराच्या प्रवासासाठी नागरिकांना 1375 रुपये मोजावे लागतात. हा महिनाभराचा पास वर्सोवा-अंधेरीसाठी उपलब्ध करुन देण्यात येतो. मात्र आता नव्या ऑफर नुसार प्रवाशांना मेट्रोने अनलिमिटेड पद्धतीने प्रवास करण्यासाठी अतिरिक्त 25 रुपये मोजावे लागणार आहेत. यासाठी प्रवाशांना 1400 रुपये द्यावे लागणार आहेत.
मेट्रोने प्रवास करताना 45 फेऱ्यांसाठी आणि महिन्याभराच्या पाससाठी जेवढे पैसे द्यावे लागतात ती सेवा कायम राहणार आहे. यामध्ये प्रवाशांकडून फक्त 35 ट्रिपचे पैसे वसूल केले जातात. जवळजवळ 50 हजार प्रवासी आठवड्याभरात लाखोवेळा मेट्रोने प्रवास करतात. मेट्रोकडून मुंबईतील प्रवाशांसाठी रिर्टन तिकिटासाठी टोकन आणि ट्रिप पास या दोन सेवा सुरु केल्या आहेत. तसेच मेट्रोचे तिकिट QR कोड स्कॅन करुन किंवा मोबाईल अॅपद्वारे काढता येते. परंतु गेल्यात आठवड्यात मेट्रोकंपनीने QR कोडच्या माध्यमातून काढण्यात येणाऱ्या तिकिटांऐवजी प्लॅस्टिकचे टोकन प्रवाशांना मिळणार आहेत.(मुंबई 24x7 ला राज्य मंत्रिमंडळाची मंंजुरी; 27 जानेवारीपासून शहरात 'नाईट लाईफ' सुरू)
मार्ग | 45 फेऱ्या | अनलिमिटेड फेऱ्या पास |
अंधेरी ते साकिनाका | 775 रुपये | 800 रुपये |
घाटकोपर ते एअरपोर्ट रोड | 775 रुपये | 800 रुपये |
घाटकोपर ते अंधेरी | 1110 रुपये | 1125 रुपये |
वर्सोवा ते घाटकोपर | 1375 रुपये | 1400 रुपये |
येत्या 23 जानेवारी पासून प्रवाशांना मेट्रोने अनलिमिटेड प्रवास करता येणार आहे. पण त्यासाठी प्रवाशांना महिन्याभरासाठी 1400 रुपये मोजावे लागणार आहेत. मात्र पास हस्तांतर करता येणार नाही आहे. सध्या अनलिमिटेड सेवा पुढील सहा महिन्यांसाठी सुरु करण्यात येणार आहे. त्यानंतर प्रवाशांची याबाबत प्रतिक्रिया घेऊन पुढे सुरु ठेवण्यात येणार आहे. या सेवेचा प्रवाशांना नक्कीच लाभ होईल अशी अपेक्षा कंपनीकडून केली जात आहे.