Mumbai Rains, Weather Forecast: मुंबई मध्ये येत्या 24 तासांत मुसळधार पावसाची शक्यता; हवामान खात्याचा अंदाज
Image used for representational purpose only | (Photo Credits: PTI)

IMD Weather Forecast Mumbai: मुंबई, ठाणे, पालघर शहरामध्ये गणेशोशोत्सवामध्ये धुव्वाधार बसलेला पाऊस आता पुन्हा दमदार कोसळणार असल्याची शक्यता आज हवामान खात्याने वर्तवली आहे. येत्या 24 तासामध्ये मुंबई शहर, उपनगर आणि ठाणे परिसरात जोरदार पावसाच्या सरी बरसू शकतात असा अंदाज आज मुंबई हवामान वेधशाळेने वर्तवला आहे. हवामान विभागाचे (पश्चिम विभाग) उपमहासंचालक के. एस. होसाळीकर (K S Hosalikar) यांनी खास ट्वीटच्या माध्यमातून मुंबईकरांना पुढील 24 तासांत मुसळधार पावसासाठी सज्ज रहा असा सतर्कतेचा इशारा दिला आहे.

आज (13 सप्टेंबर) सकाळी मुंबईमध्ये मुसळधार पावसाच्या काही सरी बरसल्या आहेत. त्यानंतर पुढील काही तासांमध्ये हा जोर अधिक बळावण्याची शक्यता असल्याचं सांगण्यात आलं आहे. त्यानुसार मुंबई , ठाणे, कोकण सह पश्चिम महाराष्ट्रामध्येही मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

के. एस. होसाळीकर ट्वीट

मुंबईमध्ये पुढील 24 तासांत मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता असल्याचा अंदाज आज होसाळीकरांनी ट्वीटरच्या माध्यमातून व्यक्त केला आहे.

ऐन गणेशोत्सवाच्या काळात 4 सप्टेंबर दिवशी मुसळधार पाऊस बरसला होता. तेव्हा तुंबई झालेल्या मुंबईत रेल्वे, रस्ते वाहतूक ठप्प झाल्याने मोठा फटका बसला होता. यंदा जुलै महिन्यापासून बरसणारा पाऊस दिवसेंदिवस विक्रमी नोंद करत आहे. यंदा सातार्‍यातील महाबळेश्वर मध्ये सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे. यामध्ये मेघालयातील चेरापुंजीलादेखील मागे टाकत नवा विक्रम रचला आहे.