Water | Representational Image | (Photo Credits: stux/Pixabay)

मुंबई महापालिकेने (BMC) एक मोठा निर्णय घेतला आहे. त्यानुसार उद्या  (1 ऑगस्ट) पासून शहरात 20 टक्के पाणी कपात (Water Cut) करण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांनी पाणी जपून वापरण्यासह त्याचा पुरेसा साठा करावा असे आवाहन करण्यात आले आहे. कारण तलावातील पाणीसाठी अत्यंत कमी झाला आहे. सध्या सात तलावातील जलसाठा फक्त 4.9 लाख मिलियन आहे. जो जलाशयाच्या पूर्ण क्षमतेपेक्षा फक्त 35 टक्के ऐवढाच आहे. गेल्या वर्षात 30 जून पर्यंत 82 टक्के जलसाठा झाल्याचे ही सांगण्यात  आले आहे.

येत्या 1 ऑक्टोंबर पर्यंत सात तलावातील एकूण जलसाठी 14.5 लाख मिलियन व्हायला हवा. असे झाल्यास शहराला वर्षाअखेर पर्यंत पाणी कपातीच्या समस्येला सामोरे जावे लागणार नाही. शहरातील पाणी कपातीचा निर्णय घेण्यापूर्वी नागरी प्रशासन आणि महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी बैठक घेत या निर्णयाची घोषणा केली आहे. दरम्यान जुलै महिन्यात मुसळधार पाऊस पडल्याचे दिसून आले. परंतु ठाणे आणि रायगड जिल्ह्यात अत्यंत कमी जलसाठा झाला आहे. तर तुळशी तलाव पाण्याने तुडुंब भरल्याचे दिसून आले आहे.(Maharashtra Monsoon 2020 Forecast: मुंबई, ठाणे, नवी मुंबई सह कोकणात 2 ऑगस्ट पासून जोरदार पावसाची शक्यता- IMD)

मुंबईकरांना योग्य पाणीपुरवणा होण्यासाठी एकूण 14 लाख 47 हजार 363 दशलक्ष लिटर पाण्याची आवश्यकता असते. परंतु सध्या फक्त 4 लाख 93 हजार 675 दशलक्ष लिटर पाणीसाठी उपलब्ध आहे. त्यामुळे नागरिकांना आता पाणी कपातीची झळ सोसावी लागणार आहे हे नक्की. या आधी नोव्हेंबर 2018 ते जुलै 2019 पर्यंत पाणी कपातीचा निर्णय जाहीर करण्यात आला होता.