महाराष्ट्रात मार्च 2020 पासून लॉकडाऊन लागल्यानंतर मुंबईचं वीरमाता जिजाबाई भोसले प्राणिसंग्रहालय आणि उद्यान (Veermata Jijabai Bhosale Udyan and zoo) हे बंद करण्यात आले आहे. मात्र आता मुंबई मधील कोरोना परिस्थिती नियंत्रणात आल्याने या राणीच्या बागेचा दरवाजा पर्यटकांसाठी उघडण्याची शक्यता आहे. येत्या 15 फेब्रुवारीपासून पर्यटकांना राणीच्या बागेत प्रवेश मिळू शकतो. असे मीडीया रिपोर्ट्समधून पुढे आले आहे. मुंबई: भायखळा मधील राणीच्या बागेत Penguins नंतर आता Anacondas आणण्याची तयारी सुरू.
दरम्यान राणीची बाग पुन्हा मुंबईकर आणि पर्यटकांना उघडल्यास त्यांना 'शक्ती' आणि करिश्मा या दोन रॉयल बंगाल टायगर्स बघायला मिळतील. यांना औरंगाबादच्या प्राणीसंग्रहातून मुंबई मध्ये आणण्यात आले होते. त्यांना पर्यटकांनी पहावं यासाठी 25 मार्च 2020 पासून मुभा मिळणार होती पण त्याआधीच आठवडाभर लॉकडाऊन जाहीर झाला.
सध्या राणीची बाग पुन्हा पर्यटकांना खुली करावी यासाठी मुंबई पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांना पत्र पाठवण्यात आलं आहे. त्यामुळे आयुक्त यावर काय निर्णय घेतात यावरच पुढील गोष्टी अवलंबून आहे. लॉकडाऊन पूर्वी राणीच्या बाहेत नियमित 5-6 हजार पर्यटक येत असे. पण आता कोरोना परिस्थितीमुळे त्यावर निर्बंध घालणं आवश्यक होणार आहे. त्यामुळे नियमित पर्यटकांच्या प्रवेशावर काही मर्यादा येऊ शकते.
इक्बाल सिंह चहल यांनी यंदा पालिकेच्या उत्पन्नामध्ये घट झाल्याचं आर्थिक संकल्प मांडताना म्हटलं होतं. तर काही दिवसांपूर्वीच पालिका मुख्यालयामध्ये हेरिटेज वॉक सुरू करण्यात आला आहे. त्याद्वारे पर्यटकांना पालिकेची ब्रिटीशकालीन वास्तू आतून पाहण्यास मिळते.