मुंबई: भायखळा मधील राणीच्या बागेत Penguins नंतर आता Anacondas आणण्याची तयारी सुरू
भायखळ्यामधील (Byculla Zoo) राणीची बाग (Ranichi Baug) म्हणजेच वीरमाता जिजामाता उद्यान आता पेंग्विन पाठोपाठ अॅनाकोंडाच्या (Anacondas) स्वागताच्या तयारीसाठीदेखील सज्ज झाले आहे.
भायखळ्यामधील (Byculla Zoo) राणीची बाग (Ranichi Baug) म्हणजेच वीरमाता जिजामाता उद्यान आता पेंग्विन पाठोपाठ अॅनाकोंडाच्या (Anacondas) स्वागताच्या तयारीसाठीदेखील सज्ज झाले आहे. मूळची साऊथ अमेरिकेची असलेली अॅनाकोंडा ही सापाची जात म्हणजे जगातील सर्वात मोठा साप. राणीच्या बागेत अॅनाकोंडासाठी खास रेपटाईल पार्क बनवण्यात आलं आहे. आता केंद्रीय मंजुरीसाठी Central Zoo Authority प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. यामध्ये भारत आणि परदेशातील 20 विविध सापांच्या जाती ठेवल्या जाणार आहेत.
दीड हजार स्क्वेअर मीटर वर असणार्या या पार्कसाठी मुंबई महानगरपालिकेने आवश्यक फंड दिला होता. आता 120 कोटी रूपये फंडाचा वापर करून दुसर्या टप्प्यातील काम सुरू करण्यात आल्याची माहिती टाईम्स ऑफ इंडियाने दिली आहे.
2016 साली बीएमसीने राणीच्या बागेत पेंग्विंस आणले आहेत. त्यांच्यासाठी विशेष कक्ष उभारले आहेत. दरम्यान त्यामधील दोघांचा मृत्यू देखील झाला आहे. मुंबईमध्ये पेग्विन आणल्याच्या बीएमसीच्या घाटावर अनेकांनी पालिकेवर टीका देखील केली होती. आरे वसाहतीत सुरु होणार नवी 'राणीची बाग'.
1982साली राणीची बाग उभारण्यात आली आहे. त्यावेळेस 53 एकरवर असलेल्या राणीच्या बागेचं क्षेत्र काही वर्षांपूर्वी वाढवण्यात आले आहे. मफतलाल मिल्सची 7 एकर जागा पालिकेने विकत घेतली आहे.
(The above story first appeared on LatestLY on Nov 15, 2020 12:55 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

