
सर्व बच्चे कंपनीसह संपुर्ण कुटूंब जिथे आर्वजून भेट देतात ते ठिकाण भायखळ्यातील राणीची बाग(Jijamata Udyaan). या राणीची बागेत कित्येक नवनवीन गोष्टी आपल्याला दर दिवसा पाहायला मिळतात. मग प्राणी असो, पक्षी असो वा अन्य काही. मात्र आता लवकरच मुंबईत अशाच एका मोक्याची ठिकाणी एक नवीन 'राणीची बाग' सुरु करण्यात येणार आहे. गोरेगावमधील आरे वसाहतीत (Aarey Colony) गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या नवीन राणीची बाग वसविण्याच्या प्रस्तावावर आज शिक्कामोर्तब करण्यात येणार आहे. आज पर्यावरण दिनाचे औचित्य साधून हा करार करण्यात येणार आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, अर्थ व वनमंत्री सुधीर मुनंगटीवार, पर्यावरण मंत्री रामदास कदम यांच्या उपस्थितीत हा करार होणार आहे.
आरे वसाहतीत आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्राणीसंग्रहालय विकसित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पश्चिम उपनगरातील लोकांना प्राणीसंग्रहालय पाहण्यासाठी थेट भायखळ्याच्या जिजामाता उद्यानापर्यंत यावे लागते. मात्र तेथील रहिवाशांसाठी उत्तम दर्जाचे पर्यटनस्थळ विकसित करण्यासाठी आरे कॉलनीत हे प्राणीसंग्रहालय विकसित करण्यात येणार आहे.
शिक्षण आणि मनोरंजन अशा दोन्ही हेतूने हे प्राणीसंग्रहालय उभे राहणार असून केवळ मनोरंजनावर भर न देता दुर्मीळ वन्यजीवांच्या प्रजातींचे संरक्षण व संवर्धन केंद्र म्हणून तसेच निसर्ग शिक्षण केंद्र म्हणून हे प्राणीसंग्रहालय साकारले जाणार आहे.
मुंबईकरांनो सावधान! राणीच्या बागेत होतंय बिबट्याचे आगमन, जून 2019 पासून घेता येणार भेट
त्याचबरोबर जीवसृष्टीत मोठय़ा संख्येने असलेल्या निशाचर प्राण्यांचे व सरपटणाऱ्या प्राण्यांचे अभ्यासपूर्ण निरीक्षण करता यावे यासाठी सिंगापूर येथील प्रसिद्ध नाईट सफारीच्या संकल्पनेवर आधारित येथे 'नाईट झू सफारी' विकसित करण्यात येणार आहे.