Kishori Pednekar | (Photo Credits: ANI)

Mumbai Vaccination Update: अरबी समुद्रात निर्माण झालेल्या तौक्ते चक्रीवादळामुळे राज्यासह मुंबईत वेगाने वारे वाहत आहेत. तर चक्रीवादळामुळे नागरिकांना त्याचा फटका बसू नये म्हणून महापालिकेकडून उद्या (17 मे) लसीकरण बंद असणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. याबद्दल महापौर किशोरी पेडणेकर यांनी माहिती दिली आहे. याआधी सुद्धा शनिवारी (14 मे) आणि आज (15 मे) लसीकरण बंद ठेवण्यात आले होते.(Cyclone Tauktae: तौक्ते चक्रीवादळाचा जोर आणखी वाढणार, मुंबई-ठाणे येथे तुफान पावसाची शक्यता)

मुंबईतील आयएमडी विभागाकडून तौक्ते चक्रीवादळ  पुढील 24 तासात आणखी रौद्र रुप निर्माण करणार आहे. 18 मे रोजी सकाळी गुजरातला धडकणार असल्याची शक्यता आहे. त्यांनी असे म्हटले की, मुंबईत आज सुद्धा मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. सोमवारी (17 मे) सुद्धा जोरात पाऊस पडणार असून 18 मे रोजी मध्यम पावसाची शक्यता आहे. मुंबईत आज आणि उद्या 60-70 किमी प्रति तास वेगाने वारे वाहणार आहेत. याच कारणास्तव खबरदारी म्हणून लसीकरण बंद ठेवण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. परंतु मंगळवार पासून लसीकरण नेहमी सारखे सुरु होईल असे ही किशोरी पेडणेकर यांनी म्हटले आहे.

Tweet:

दरम्यान काही दिवसांपूर्वीच किशोरी पेडणेकर यांनी असे म्हटले होते की, मुंबईत कोरोनाची परिस्थिती काही प्रमाणात नियंत्रणात येत असल्याचे दिसून येत आहे. मात्र लसीकरणासाठी लसीच्या डोसचा तुटवडा पडत असल्याची समस्या उद्भवत आहे. त्यामुळेच 50 लाख लसींसाठी एक ग्लोबली टेंडर काढून त्या खरेदी केल्या जाणार असल्याचे किशोरी पेडणेकर यांनी स्पष्ट केले होते.