कोरोनाविरोधातील (Coronavirus) लढाई जिंकण्यासाठी राज्य सरकारकडून सर्वोतपरी प्रयत्न सुरु आहेत. उद्योजक, कंपन्यांचे प्रमुख, स्वंयसेवी संस्था,धार्मिक संस्था, कलाकार, राज्य शासनाच्या बरोबरीने या युद्धात सहभागी होऊन मदत करत आहे. सामाजिक क्षेत्रातील व्यक्तींही याला हातभार लावत आहेत. यातच मुंबई विद्यापीठाने (Mumbai University) आपल्या कर्मचाऱ्यांना आपला एक दिवसाचा पगार मुख्यमंत्री मदत निधीसाठी (Chief Minister's COVID19 Relief Fund) देण्यात यावा, असे आपल्या कर्मचाऱ्यांना आवाहन केले आहे. यात शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. कोरोनाविरोधातील लढ्यात देशातील आपत्कालीन सुविधेला अधिक बळ मिळावे, यासाठीच मुंबई विद्यापीठाने हा निर्णय घेतल्याचे समजत आहे. दरम्यान, महाराष्ट्रातील अनेक नागरिकही मुख्यमंत्री मदत निधीसाठी हातभार लावत आहेत.

कोरोना विषाणुने संपूर्ण भारतात थैमान घातला आहे. चीनमध्ये जन्मलेल्या कोरोना विषाणुने आता भारतातही धुमाकूळ घालायला सुरुवात केली आहे. भारतात सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आढळून आले आहेत. यामुळे राज्यातील नागरिक पूर्णपणे घाबरले आहेत. कोरोनामुळे अर्थव्यवस्थेला धक्का लागला आहे. यामुळे उद्योजकांपासून तर, सामान्य नागरिकांपर्यंत प्रत्येकजण मुख्यमंत्री मदत निधीसाठी हातभार लावत आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबई विद्यापीठाने शिक्षक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी आणि इतर कर्मचाऱ्यांना आपला एक दिवसाचा पगार मुख्यमंत्री मदत निधीसाठी द्यावे, असे आवाहन केले आहे. कोरोना विषाणूमुळे राज्यात बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. तसेच कोरोना विषाणूवर मात करण्यासाठी प्रशासनाकडून युद्धपातळीवर प्रयत्न केले जात आहे. हे देखील वाचा- लॉकडाऊनमध्ये हातावर पोट भरणाऱ्यांना मदत करण्यासाठी केंद्र सरकारने तात्काळ ठोस पावले उचलली पाहिजेत- बाळासाहेब थोरात

एएनआयचे ट्वीट-

जगभरात कोरोनाबाधीतांची संख्या 6 लाख 81 हजार 706 वर पोहचली आहे. यांपैकी 31 हजार 882 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर, 1 लाख 45 हजार 696 रुग्ण बरे झाल्याची माहिती समोर आली आहे. आता भारतही कोरोना विषाणूच्या जाळ्यात अडकत चालला असल्याची चिन्ह दिसू लागली आहे. भारतात आतापर्यंत एकूण 1 हजार 24 कोरोना बाधीत आढळले आहेत. त्यांपैकी 29 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर, 96 लोक बरे झाले आहेत. भारतात सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आढळले आहेत. महाराष्ट्रात आतापर्यंत कोरोनाबाधीतांची संख्या 215 वर पोहचली आहे. यात 8 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, 35 रुग्ण कोरोना विषाणूच्या जाळ्यातून बाहेर आल्याचे समजत आहे