कोरोना विषाणुचा (Coronavirus) वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशात 21 दिवसाचा संचारबंदी (Lockdown) घोषीत केली आहे. यामुळे हातावर पोट भरणाऱ्यांनाचे मोठे हाल होत आहे. लॉकडाऊनमध्ये हातावर पोट भरणाऱ्यांना मदत करण्यासाठी केंद्र सरकारने तात्काळ ठोस पावले उचलली पाहिजेत, अशी मागणी काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी केली आहे. कोरोना विषाणुने संपूर्ण भारतात थैमान घातले आहे. कोरोना विषाणुवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रशासनाकडून युद्धपातळीवर प्रयत्न केले जात आहेत. राज्यात कोरोनाबाधीत रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होऊ लागली आहे. यामुळे नागरिकांमध्ये भितीजनक वातावरण निर्माण झाली आहे. चीनमध्ये जन्मलेल्या कोरोना विषाणूने संपूर्ण जगात हाहाकार घालायला सुरुवात केली आहे.
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 24 मार्च रोजी यांनी संचारबंदीची घोषणा केली होती. त्यानंतर अत्यावश्यक सेवा वगळता संपूर्ण भारत बंद आहे. यामुळे हातावर पोट भरणाऱ्यांचे अधिक हाल होत आहे. त्यांना 2 वेळेचे जेवण मिळवण्यासाठी धडपड करावी लागत आहे. कोरोनाला रोखण्यासाठी गरजेचा असलेला पण नियोजन नसलेला 21 दिवसांचा लॉकडाऊन, उदरनिर्वाहासाठी काहीच नसल्याने आपल्या गावी परतण्याचा प्रयत्न करत असलेल्या नागरिकांनी आपला जीव गमवला आहे, असा दावा काँग्रेसच्या पक्षाने केला आहे. त्यानतंतर काँग्रेस नेते बाळासाहेबांनीही हात पोटभरणाऱ्यांचा मुद्दा उचलला आहे. आपल्या देशातील बहुतांश लोक दिवसभर जे कमावतात त्यावरच त्यांचे घर चालते, घरातील लोकांना दोन वेळचे जेवण मिळते. लॉकडाऊन मुळे रोजगार गेल्याने हे गरीब लोक मोठ्या संकटात सापडलेत. त्यांना मदत करण्यासाठी केंद्र सरकारने तात्काळ ठोस पावले उचलली पाहिजेत, असेही ते म्हणाले आहेत. हे देखील वाचा- Coronavirus Outbreak In Maharashtra: पुणे शहरात खाजगी रूग्णालयामध्ये 52 वर्षीय कोरोना बाधिताचा मृत्यू; राज्यातील मृतांचा आकडा 9
बाळासाहेब थोरात यांचे ट्वीट-
आपल्या देशातील बहुतांश लोक दिवसभर जे कमावतात त्यावरच त्यांचे घर चालते, घरातील लोकांना दोन वेळचे जेवण मिळते. लॉकडाऊन मुळे रोजगार गेल्याने हे गरीब लोक मोठ्या संकटात सापडलेत. त्यांना मदत करण्यासाठी केंद्र सरकारने तात्काळ ठोस पावले उचलली पाहिजेत.#LockdownWithoutPlan pic.twitter.com/MA2aGNRxa0
— Balasaheb Thorat (@bb_thorat) March 30, 2020
जगभरात कोरोनाबाधीतांची संख्या 6 लाख 81 हजार 706 वर पोहचली आहे. यांपैकी 31 हजार 882 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर, 1 लाख 45 हजार 696 रुग्ण बरे झाल्याची माहिती समोर आली आहे. आता भारतही कोरोना विषाणूच्या जाळ्यात अडकत चालला असल्याची चिन्ह दिसू लागली आहे. भारतात आतापर्यंत एकूण 1 हजार 24 कोरोना बाधीत आढळले आहेत. त्यांपैकी 29 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर, 96 लोक बरे झाले आहेत. भारतात सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आढळले आहेत. महाराष्ट्रात आतापर्यंत कोरोनाबाधीतांची संख्या 215 वर पोहचली आहे. यात 8 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, 35 रुग्ण कोरोना विषाणूच्या जाळ्यातून बाहेर आल्याचे समजत आहे.