Mumbai Traffic | Photo Credits: ANI

मुंबई मध्ये आज मान्सूनचं आगमन झालं आहे. मान्सूनचा पहिला पाऊसचं दमदार असल्याने मुंबई शहराच्या अनेक सखल भागात पाणीच पाणी झालं आहे. सध्या सायन, किंग्स सर्कल, हिंदमाता, जीटीबी आणि चुनाभट्टी सह चेंबुरच्या काही सखल भागात पाणी साचलं आहे. यामुळे सध्या मुंबई लोकल आणि रस्ते वाहतूक मंदावली आहे. सायन-माटुंगा भागामध्ये काही ठिकाणी डायव्हर्जेन देण्यात आली आहेत. त्यामुळे तुम्हांला आज काही महत्त्वाच्या कामासाठी बाहेर पडायचं असेल तर तर सध्या शहरातील ट्राफिकची अवस्था काय आहे? लोकल, रस्ते वाहतूक कशी आहे? याचे हे काही अपडेट्स पाहूनच घराबाहेर पडा.

दरम्यान मुंबई शहरामध्ये काल रात्रीपासून पावसाची रिपरिप सुरू आहे. अधून मधून जोरदार सरी बरसत असल्याने मुंबईकरांची त्रेधा तिरपिट उडाली आहे. नक्की वाचा: Monsoon Update: मुंबईत मुसळधार पावसाला सुरुवात, हवामान खात्याकडून रायगड जिल्ह्यात हायअलर्ट जाहीर.

मुंबई लोकल अपडेट्स

सायन, कुर्ला, चुनाभट्टी भागात पाणी साचल्याने मध्य रेल्वे, हार्बर रेल्वे विस्कळीत झाली आहे. सध्या रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, हार्बर रेल्वे मार्गावर सीएसएमटी ते वाशी रेल्वेसेवा बंद करण्यात आली आहे. तर मध्य रेल्वेवर सीएसएमटी- ठाणे ही रेल्वे सेवा देखील बंद करण्यात आली आहे. मध्य रेल्वे मार्गावर सीएसएमटी - कुर्ला रेल्वे सेवा बंद करण्यात आली आहे. दरम्यान इतर मार्गावरील सार्‍या सेवा सुरू आहेत.

सायन, जीटीबी रेल्वे स्थानकांत रूळांवर पाणी

 

बेस्ट बस मार्गातील बदल 

आज सखल भागात पाणी साचल्याने सायन, किंग्स सर्कल आणि माटुंगा भागातून जाणार्‍या बेस्ट बसच्या सेवेमध्ये बदल करण्यात आले आहेत.

चेंबूर मध्ये ट्राफिक जॅम

मुंबई मध्ये चेंबूरच्या सखल भागात पाणी साचले आहे. यामुळे ईस्टर्न एक्सप्रेस हायवे वर देखील वाहतूक मंद गतीने पुढे सरकत आहे.

अंधेरी सब वे बंद

दरम्यान मुंबई हवामान खात्याने 12 जून पर्यंत अतिवृष्टी होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. याच्या पार्श्वभूमीवर आता आपत्कालीन कक्ष सज्ज करण्यात आला आहे. मुंबईतील समुद्रात सकाळी 11.43 मिनिटांनी  भरती असल्याने  4.16 मीटर उंचीच्या लाटा उसळणार आहेत.