Mumbai Toll Rate Hike: मुंबईत 1 ऑक्टोबरपासून टोल दरवाढ, छोट्या गाड्यांसाठी 40 रुपये तर ट्रक, बसेस करता मोजावे लागणार 130 रुपये
Image used for representational purpose only. | Image Courtesy: Wikimedia Commons

लॉकडाऊनमुळे (Lockdown) अनेकांना बेरोजगारीचा सामना करावा लागत असून आता दुसरीकडे महागाई वाढल्याने सामान्य नागरिकांचे कंबरडं चांगलच मोडणार आहे. मुंबईत 1 ऑक्टोबरपासून टोल दरवाढ (Toll Rate Hike) लागू करण्यात आली असून यामुळे छोट्या (Car) आणि जड वाहनांच्या टोलदरात वाढ करण्यात आली आहे. नव्या दरानुसार छोट्या गाड्यांसाठी 40 रुपये तर ट्रक, बसेस (Truck, Buses) करता 130 रुपये मोजावे लागणार आहे. मुंबईतील 5 प्रवेशद्वारांवर ही टोलवाढ लागू करण्यात आली आहे.

यात टोलवाढीत मुलुंड (Mulund), वाशी (Vashi), दहिसर(Dahisar), ऐरोली (Airoli) आणि लाल बहादूर शास्त्री मार्ग (Lal Bahadur Shastri Marg) या पाच टोलनाक्यांचा समावेश असेल. वाढलेले नवे दर 30 सप्टेंबर 2023 पर्यंत लागू असतील. Mumbai Local Updates: मुंबई लोकलच्या मध्य रेल्वे मार्गावरील ट्रेन्समध्ये गर्दी टाळण्यासाठी आजपासून 68 अधिक फेर्‍या वाढवल्या; सोशल डिस्टंसिंग पाळण्याचं आवाहन

राज्ये रस्ते विकास महामंडळासोबतच्या करारानुसार दर तीन वर्षांनी टोलदरात वाढ होते. त्यानुसार कार आणि जीपसारख्या वाहनांना एकेरी प्रवासासाठी पाच रुपयांची वाढ होऊन टोल आता 40 रुपये होणार आहे. हलक्या वाहनांचा मासिक पासमध्येही 100 रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे मासिक पास आता 1400 रुपयांवरुन 1500 रुपये होणार आहे.

त्याचबरोबर हलक्या वाहनांच्या मासिक पासमध्येही दरवाढ करण्यात आली आहे. नव्या दरानुसार आता हलक्या वाहनांना मासिक पाससाठी 1500 रुपये मोजावे लागणार आहे. तर अवजड वाहनांसाठी 160 रुपये मोजावे लागतील. या दरवाढीमुळे रोज वाहनाने प्रवास करणा-या लोकांना महागाईला सामोरे जावे लागणार आहे.

सध्या लॉकडाऊनमुळे मुंबईची लाईफलाईन समजली जाणारी रेल्वे सेवेचा लाभ केवळ अत्यावश्यक सेवेत येणा-या कर्मचा-यांनाच घेता येत आहे. यामुळे अन्य सेवेतील कर्मचा-यांना रोड ट्रान्सपोर्टचा आधार घ्यावा लागत आहे. त्यासाठी बसेस, रिक्षा, कार मधून असंख्य लोक प्रवास करत आहे. यामुळे ट्रॅफिकची समस्याही उद्बवत आहे. यात आता सरकारने केलेली ही टोलवाढ सामान्यांच्या खिशाला चाप बसणारी आहे.