Abuse| (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

डेटींग अॅपच्या (Dating App) माध्यमातून झालेल्या ओळखीचा फायदा घेत एका महिलेवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना पुढे येत आहे. ऑनलाईन फ्रेंड (Online Friend) असलेल्या आरोपीने महिलेला त्याच्या गावी बोलावले आणि तिच्यावर बलात्कार केला. आरोपी इतक्यावरच थांबला नाही तर त्याने तिच्याकडील पैसे आणि इतर ऐवजही लुटल्याचे वृ्त्त आहे. पीडितेने दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, तपास सुरु आहे. पीडितेच्या तक्रारीमुळे घडल्या प्रकाराला वाचा फुटल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.

पीडितेने दिलेल्या तक्रारीवरु मुंबई पोलिसांनी भादंसं कलम 376 (बलात्कार), 384 (खंडणी) आणि 419 (ओळखीतून फसवणूक) अन्वये ओरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. आरोपी हा छत्रपती संभाजीनगर येथील वाकोला पोलीस स्टेशन हद्दीत राहणारा असल्याची प्राथमिक माहिती आहे.

लॅब टेक्निशियन असलेल्या महिलेची आरोपी समीर शेखसोबत डेटिंग अॅप्लिकेशनवरून मैत्री झाली. त्याने तिला छत्रपती संभाजीनगर येथे भेटण्यासाठी येण्यास सांगितले. तिने नकार देताच आोरपीने व्हिडिओ कॉलवर गळा चिरून जीवे मारण्याची धमकी दिली. त्यामुळे ती त्याला भेटण्यासठी छत्रपती संभाजीनगर येथे गेली होती, असे तिने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.

दरम्यान, महिला आरोपीला भेटायला गेली असता त्याने तिला एका हॉटेलमध्ये नेऊन तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर त्याने तिला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. मोबाईल फोनसाठी पैसे देण्यास भाग पाडले. आरोपीला पैसे देण्यासाठी पीडितेला त्याच्या आईनेही धमकावल्याचे पोली अधिकाऱ्याने प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले. अधिका-याने असेही सांगितले की, आरोपीने महिलेला लग्न करण्याचे आश्वासनही दिले होते. त्यातून त्याने दोघांमधील काही खासगी संबंधाचे व्हिडिओ चित्रिकरण केले. त्यानंतर त्याने तिच्याकडे पैशासाठी तगादा लावला. पैसै दिले नाहीत तर व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली.

महिला परत मुंबईत आल्यानंतरही आरोपी तिला ब्लॅकमेल करत होता आणि आणखी पैशांची मागणी करत होता. महिलेने त्याचे पालन केले असले तरी आरोपीने व्हिडिओ शेअर केल्याने ती घाबरली होती. नंतर, तिने पोलिसांकडे जाऊन आरोपीविरुद्ध औपचारिक तक्रार दाखल केली, ज्यावर आयपीसीच्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला होता. आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांनी शोधमोहीम सुरू केली आहे.