Mumbai Rains, Weather Forecast: मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये पुढील 4-6 तास पावसाचा जोर कायम राहणार; हवामान खात्याचा अंदाज
Image used for representational purpose only | (Photo Credits: PTI)

मुंबईकरांची आज (25 सप्टेंबर) सकाळ वीजांचा कडकडाट, ढगांचा गडगडाटासह काही दमदार पावसाच्या सरींनी झाला आहे. मागील काही दिवस पावसाने विश्रांती घेतल्याने मुंबईकरांना उष्णतेचा त्रास जाणवत होता. मात्र काल रात्रीपासून पावसाच्या दमदार सरी पुन्हा मुंबईत कोसळत असल्याने काही सखल भागात पाणी साचले आहे. हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार मुंबईसह उपनगरात, ठाणे, पालाघर या भागात पुढील काही तास दमदार पावसाच्या सरी बरसण्याची शक्यता आहे. स्कायमेट या खाजगी हवामान अंदाज वर्तवणार्‍या संस्थेने पुढील 4 ते 6 तास मुंबईत बोरीवली, पवई, विरार, वांद्रे, दादर, नवी मुंबई, मीरा भायंदर, मुलुंड, डोंबिवली सह अलिबाग, पालघर भागात मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता वर्तवली आहे. आज सकाळपासून मुंबई प्र्माणेच कोकण, गोवा, पुणे,नाशिक, विदर्भ, मराठवाडा या महराष्ट्राच्या विविध भागाताही पावसाचा जोर कायम आहे.

ANI च्या ट्वीटनुसार हवामान खात्यानेही मुंबई शहरावर मुसळधार पावसाची शक्यता असल्याचीही काही रडार इमेजेस शेअर केली आहेत. त्यानुसार मुंबईकरांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. मुंबईमध्ये मागील काही दिवस पावसाने विश्रांती घेतल्याने घामाच्या धारेत भिजणार्‍या मुंबईकरांनी आजच्या पावसामुळे सकाळी हवेत पुन्हा गारवा पसरल्याने त्याचं स्वागत केलं आहे. अनेकांनी ट्वीटरच्या माध्यमातून खास फोटो, व्हिडिओ देखील शेअर केले आहेत.

स्कायमेट ट्वीट

 

पुण्यातही पावसाचा जोर कायम

पुण्यातही काल रात्रीपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. पुणे रेल्वे स्टेशनजवळील रस्ता, एसएनडीटी परिसर, आघारकर रस्ता, कर्वे रस्ता, डेक्कन, कोथरूड येथे रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. त्यामुळे नागरिकांना पाण्यातूनच वाटा काढत पुढे जावं लागत आहे.

सध्या हा पावासाचा जोर कायम राहण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवल्याने आज घराबाहेर पडताना मुंबईकरांनी काळजी घ्यावी असं आवाहनही करण्यात आले आहे.