Mumbai Rains: कोरोना रुग्ण असलेल्या नायर रुग्णालयात पावसाचं पाणी शिरलं (See Photos & Video)
Nair Hospital Rainwater (Photo Credits: ANI)

Mumbai Rain Update: हवामान खात्याच्या (IMD) अंदाजानुसारच, काल मध्यरात्रीपासुन मुंंबई व उपनगरात जोरदार पाऊस सुरु झाला आहे. मुंंबई मध्ये मागील 24 तासात 173 मिमी पावसाची नोंंद झाली आहे. अशावेळी शहरातील अनेक रस्ते जलमय झाले आहेत, सायन (Sion) , वडाळा (Wadala), किंग्स सर्कल (Kings Circle)  भागात तर गुडघाभर पाणी साचल्याचे दृश्य सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे. अशातच एक चिंंताजनक माहिती समोर येतेय. मुंंबई मध्ये कोरोना रुग्णांसाठी (Coronavirus Patients)  समर्पित असलेल्या नायर रुग्णालयात (Nair Hospital) पावसाचंं पाणी शिरलं आहे.ANI या वृत्तसंंस्थेने शेअर केलेल्या फोटो मध्ये आपण पाहु शकाल की अक्षरशः हॉस्पिटलच्या प्रवेशाजवळ असलेल्या पायर्‍यांंच्या वर पर्यंत पाणी येऊन रिसेप्शन काउंटर जवळ सुद्धा गुडघाभर पाणी आहे. तसेच नायर रुग्णालयाच्या परिसरात तर पार कंंबरे इतके पाणी साचले आहे. Mumbai Rains: मुंबईमध्ये सकाळपासून मुसळधार पाऊस; अनेक भागांत साचले पाणी, नेटिझन्सनी शेअर केले Pics & Videos

राज्यात 24 सप्टेंबर पर्यंत जोरदार पावसाची शक्यता असल्याचे आयएमडी कडुन सांंगण्यात आले होते, वास्तविक आज पावसाचा जोर कमी होईल असेही अंदाज आयएमडीने वर्तवले होते मात्र सध्याची परिस्थिती पाहता आजचा दिवस तरी पावसाची अशीच तुफान बॅटिंंग सुरु राहील असे दिसतेय. Mumbai Local Updates: मुंबई मध्ये मुसळधार पावसामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत

ANI ट्विट

दरम्यान, मुंंबई महापालिकेचे कर्मचारी ठिकठिकाणी पाणी उपसण्याचे काम करत आहेत, आजच्या दिवशी अत्यावश्यक सेवा वगळता अन्य सर्व कार्यालये बंंद ठेवली जावीत व नागरिकांंना घराबाहेर पडु नये असे आवाहन सुद्धा करण्यात आले आहे.