Mumbai Rains: मुंबईमध्ये सकाळपासून मुसळधार पाऊस; अनेक भागांत साचले पाणी, नेटिझन्सनी शेअर केले Pics & Videos
Representational Image | (Photo Credits: PTI)

सध्या मुंबई (Mumbai), ठाणे (Thane) सह महाराष्ट्रात मुसळधार पावसाने (Heavy Rains) हजेरी लावली आहे. मंगळवारी मुंबई शहरात पावसाच्या सरींमुळे रहिवासी भागात पाणी साचले. विशेषत: मुंबईच्या काही भागात पावसाचा जोर कायम होता व तब्बल सहा हा पाऊस कोसळत होता. त्यामुळे शहरामध्ये अनेक ठिकाणी ‘पाणीच पाणी चहूकडे’ अशी स्थिती निदर्शनास आली. या पावसामुळे अनेक ठिकाणी वाहतूक कोंडीही पाहायला मिळाली. एकीकडे कोरोना आणि दुसरीकडे पाऊस, मग काय नेटिझन्सनी सोशल मिडियावर अनेक मीम्स व फोटो शेअर करायला सुरुवात केली.

स्थानिक माध्यमांच्या वृत्तानुसार पाऊस पडल्यानंतर परळ, दादर, सायन आणि माटुंगा या सखल भागात पाणी साचले आहे. सर्वसाधारणपणे सप्टेंबरच्या मध्यामध्ये पावसाचा जोर कमी होतो. मात्र जूनमध्ये सुरू झालेला पाऊस अजून निघायचे नावच घेत नाही. मुख्यत्वे मुंबईसारख्या गर्दीच्या ठिकाणी तर पावसामुळे अतोनात हाल होत आहे. (हेही वाचा: पालघर जिल्हा पुन्हा भूकंपाच्या धक्क्यांनी हादरला, 3.5 रिश्टेर स्केल तीव्रता)

चला पाहूया या पावसामुळे युजर्सनी सोशल मिडियावर नक्की काय शेअर केले आहे.

दरम्यान, जून महिन्यात सुरु झालेला भारतातील मान्सून हंगाम, पावसाने भरलेल्या नैऋत्य मॉन्सूनच्या वाऱ्यामुळे लांबला आहे. तो ऑक्टोबरच्या दुसर्‍या आठवड्यात अधिकृतपणे संपेल. जुलै ते ऑगस्ट दरम्यान मुंबई व त्याच्या आसपासच्या भागात फार मोठ्या प्रमाणावर पावसाची नोंद झाली आहे. सप्टेंबर महिन्यापासून पावसाची वारंवारता आणि कालावधी कमी होऊ लागले. मात्र आजही मुंबई, ठाणे शहर आणि आजुबाजूच्या भागात मध्यम ते मुसळधार पाऊस बरसण्याची शक्यता वर्तवली होती.