Earthquake in Palghar: पालघर जिल्हा पुन्हा भूकंपाच्या धक्क्यांनी हादरला, 3.5 रिश्टेर स्केल तीव्रता
11 सप्टेंबरला देखील मुंबई (Mumbai) आणि नाशिक (Nashik) भागात भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले होते. यामुळे महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
पालघर जिल्ह्यामध्ये (Palghar District) गेल्या काही दिवसांपासून भूकंपाची मालिका सुरु आहे. महाराष्ट्राच्या पालघर जिल्ह्यात काल मध्यरात्री 2 वाजून 50 मिनिटांनी भूकंपाचे धक्के (Earthquake) बसले. या भूकंपाची तीव्रता 3.5 रिश्टेर स्केल इतकी होती. महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून भूकंपाचे तीव्र धक्के जाणवत आहे. 11 सप्टेंबरला देखील मुंबई (Mumbai) आणि नाशिक (Nashik) भागात भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले होते. यामुळे महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
दरम्यान 9 सप्टेंबरला देखील नाशिक आणि पालघर जिल्ह्यात भूकंपाचे धक्के जाणवले होते. या भूकंपाची तीव्रता 3.2 रिश्टेर स्केल इतकी होती. नाशिकमध्येही त्याच वेळेस पश्चिम दिशेच्या बाजूने 93 किमी दूर सौम्य भूकंपाचा धक्का जाणवला आहे. पालघर, तलासरी, डहाणू हे भूकंप प्रवण आहे. मुंबई शहरापासून अवघ्या 100 किमीवर असणार्या भागात सातत्याने भूकंपाचे धक्के जाणवतात. मागील 1-2 दिवसांत जाणवलेल्या भूकंपाच्या धक्क्यानंतर जीवीतहानी झाल्याचं वृत्त नसले तरीही घराला तडे गेल्याच्या घटना समोर आले आहे. Earthqukes in Maharashtra: आज पहाटे नाशिक, पालघर सौम्य भूकंपाच्या धक्क्याने पुन्हा हादरलं
दरम्यान मागील काही महिन्यांपासून भारतभर भूकंपाचे धक्के विविध राज्यात जाणवत आहेत. यामध्ये दिल्ली, नोएडा, अहमदाबाद, मिझोराम, बंगलोरचा समावेश आहे. मुंबई मध्ये मागील आठवड्यात भूकंपाच्या धक्क्यांसोबतच मध्यरात्री अचानक मोठ्या मेघगर्जना, वीजांचा कडकडाट ऐकायला मिळत होता. दरम्यान सध्या मुंबईमध्ये पावसाने थोडी उसंत घेतली आहे. परंतू लागोपाठ भूकंपाचे धक्के जाणवत असल्याने आता नागरिकांच्या मनात भीती आहे. सुदैवाने मागील आठवडाभर सुरू असलेल्या भूकंपाच्या मालिकांमध्ये अद्याप एकही जीवितहानी नोंदवण्यात आलेली नाही.
(The above story first appeared on LatestLY on Sep 22, 2020 10:33 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

