मुंबई-पुणे महामार्गावरील (Mumbai-Pune Highway) खालापूर हद्दीत कारचा भीषण अपघात (Car accident) झाला आहे. या अपघातात चालकाचा जागीच मृत्यू झाला आहे. संदीप दिलीप बर्वे (वय 48 वर्षे) असं मृत कार चालकाचे नाव आहे. संदीप दिलीप बर्वे हे डोंबिवली येथील रहिवासी आहेत. सध्या त्यांचे शव प्राथमिक आरोग्य केंद्र खालापूर येथे लोकमान्य रुग्णालयात पाठवण्यात आलं आहे. (हेही वाचा - Nanded Barad Accident: नांदेडमध्ये अनियंत्रित ट्रकची दुचाकींना धडक, दोन जणांचा मृत्यू)
या अपघातात एक महिलेसह 9 जण जखमी झाले आहेत. यात एका सहा महिन्याच्या बाळाचाही समावेश आहे. या अपघात सुमन बर्वे (वय 68 वर्ष) यांना गंभीर दुखापत झाली आहे, असं सांगण्यात येत आहेत. त्यांच्या व्यतिरिक्त अश्वजीत बर्वे वय 13 वर्ष, प्रणव बर्वे वय 5 वर्ष, आदेश बर्वे (वय 3 वर्ष), अनिकेत बर्वे (वय 19 वर्ष), प्रिया बर्वे (वय 18 वर्ष), गौरव बर्वे (वय 17 वर्ष), कियारा बर्वे (वय 6 महिने) यांना किरकोळ स्वरूपाचा जखमा या झाल्या आहेत.
अपघातातील वाहन रस्त्याच्या खाली असल्याने वाहतूक सुरळीत सुरु आहे. घटनास्थळी स्थानिक पोलीस, देवदुत टीम, आयआरबी कडील स्टाफ, अपघातग्रस्त मदत टीम इतर वाहन चालक उपस्थित होते. पुढील कारवाई खालापूर पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी व कर्मचारी करत आहेत