मुंबई-पुणे एक्सप्रेस वे (Mumbai Pune Expressway) वर 27 ते 29 जानेवारी दरम्यान तीन दिवसांचा ब्लॉक असणार आहे. आता त्यादृष्टीने वाहतूकीमध्ये बदल करण्यात आले आहेत. या ब्लॉकच्या दिवशी सकाळी 12 ते दुपारी 3 यावेळेत वाहतुकीमध्ये बदल करण्यात येणार आहेत. पुण्याच्या दिशेने जाणारी वाहतूक आता वरसोली टोलनाका (Varsoli Toll Naka) वरून देहू रोड मार्गे वळवली आहे. दुपारी 3 नंतर पुण्याच्या दिशेची वाहतूक पुन्हा एक्सप्रेस वे वरून चालवली जाणार आहे.
या भागात स्थानिक वाहतुकीसाठी फ्लायओव्हर्स उभारले जात आहेत. दरम्यान या भागात स्थानिक वाहतुकीसाठी फ्लायओव्हर्स उभारले जात आहेत त्याचाच कामासाठी आता मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर 3 दिवसांचा ब्लॉक असणार आहे.
मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर वाहतूकीमध्ये हा बदल केवळ मुंबई- पुणे लेन वर लागू असणार आहे. पुण्याकडून मुंबईला जाणारी वाहतूक ही पूर्णपणे सुरळीत असणार आहे. त्यामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. दरम्यान दुपारी 3 नंतर मुंबई-पुणे वाहतूक देखील प्रवासासाठी नियमित खुली केली जाणार आहे. या ब्लॉक दरम्यान कोणतीही अडचण आल्यास प्रवासी मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाच्या नियंत्रण कक्षाशी 9822498224 , महामार्ग पोलीस विभागाच्या 9833498334 या क्रमांकावर संपर्क साधू शकतात.