Accident (PC - File Image)

मुंबई-पुणे एक्सप्रेस वे (Mumbai-Pune Expressway)वर आज सकाळी झालेल्या भीषण अपघातात (Accident) तीन जर जागीच ठार झाले आहेत. हा अपघात आढे गाव हद्दीत घडला. अपघातातील कार (MH 04 JM 5349) मुंबईहून पुण्याच्या दिशेने निघाली होती. दरम्यान, रस्त्यावरुन पुढे निघालेल्या ट्रकला (RJ 09 JB 3638) या कारने पाठिमागून जोराची धडक दिल्याने हा अपघात घडला. धडक इतकी जोरदार होती की, कार ट्रकच्या पाठिमागील बाजूस जवळपास आर्धी आत घुसली. कारमधील चालकासह तिघांचा जागीच मृत्यू झाला.

मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वर गस्त घालणाऱ्या पोलिसांसह या अपघाताची माहिती आयआरबी पेट्रोलिंग आणि देवदूत यंत्रणा यांनाही मिळाली. अपघाताची माहिती मिळताच तातडीने मदत आणि बचाव कार्य सुरु झाले. दोन्ही अपघातग्रस्त वाहने पोलिसांनी बाजूला घेतली. कारमधील सर्वांना बाहेर काढण्यात आले. (हेही वाचा, Mumbai Crime: बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या 12व्या मजल्यावर आढळला मृतदेह, पोलिसांकडून अज्ञात व्यक्तीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल)

मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग हा भारतातील महाराष्ट्र राज्यातील मुंबई आणि पुणे या दोन प्रमुख शहरांना जोडणारा सहा-लेन टोल एक्सप्रेस वे आहे. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या नावावरून याला यशवंतराव चव्हाण मुंबई पुणे द्रुतगती मार्ग म्हणूनही ओळखले जाते. गुळगुळीत पृष्ठभाग, सुनियोजित डिझाइन आणि सुंदर दृश्यांमुळे हा भारतातील सर्वोत्तम महामार्गांपैकी एक मानला जातो.

ट्विट

मुंबई-पुणे प्रवासाचा वेळ कमी करण्यासाठी हा एक्स्प्रेस वे बांधण्यात आला होता, जो पूर्वी सुमारे 5 ते 6 तास लागत होता. एक्स्प्रेस वेमुळे प्रवासाचा वेळ जवळपास 2-3 तासांवर आला आहे. याने दोन शहरांमधील कनेक्टिव्हिटी देखील सुधारली आहे, ज्यामुळे प्रदेशात आर्थिक वाढ आणि विकास वाढला आहे, असा दावा करण्यात येतो.