मुंबईत कोरोनाबाधितांचा आकडा दिवसागणिक वाढत असताना आपल्या पर्यंत त्याचे सर्व अपडेट न्यूजच्या माध्यमातून पोहचवले जातात. याच दरम्यान काही दिवसांपूर्वी मुंबईतील जवळजवळ 53 पत्रकारांची कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली होती. त्यानंतर आता मुंबई महापालिकेने माहिती देत असे सांगितले आहे की, 31 कोरोनाबाधित पत्रकारांची दुसरी कोरोनाची चाचणी निगेटिव्ह आल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच या पत्रकाकांना 14 दिवसांसाठी होम क्वारंटाइनचा सल्ला देण्यात आला आहे. लॉकडाउनच्या काळात फक्त अत्यावश्यक सेवासुविधा पुरवणाऱ्यांना घराबाहेर पडण्याची परवानगी आहे. अन्यथा नियमाचे उल्लंघन केल्यास कारवाई पोलिसांकडून करण्यात येत आहे.
महाराष्ट्रातील सर्वाधित कोरोनाबाधित रुग्ण मुंबई आणि पुणे येथे आढळून आले आहेत. त्यामुळे मुंबई आणि पुणे शहरांना रेड झोन मध्ये दाखल केले आहेत. तसेच 20 एप्रिल पासून कोरोनाच्या नॉन हॉटस्पॉट ठिकाणी लॉकडाउनचे नियम शिथिल करण्यात आले आहेत. परंतु तरीही नागरिकांनी घराबाहेर पडत गर्दी न करण्यासोबत सोशल डिस्टंन्सिंगच्या नियमाचे पालन करावे असे आवाहन करण्यात आले आहेत. याच दरम्यान आता एक दिलासादायक बातमी असून 31 पत्रकारांची कोरोनाची चाचणी निगेटिव्ह आली आहे. सायन मधील प्रतिक्षा नगर येथील प्रेस इन्केल्व मधील दोन पत्रकारांची चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यानंतर इमारतीमधील नागरिकांनी या दोन पत्रकरांचे टाळ्या वाजवत स्वागत केले आहे.(Coronavirus: मुंबईतील एका नामांकित वाहिनीच्या सक्रीय पत्रकाराची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह; अनेक चॅनल्स असलेल्या एका मोठ्या समूहाच्या 6 कर्मचाऱ्यांनाही कोरोनाची लागण)
#WATCH Mumbai: Housing Society members of Press Enclave in Pratiksha Nagar, Sion East welcome two journalists by applauding for them, as they return home after getting discharged today from hospital. The second #COVID19 report of the two journalists came negative. pic.twitter.com/2Tz63TwxxK
— ANI (@ANI) April 26, 2020
दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज जनतेशी संवाद साधत आपल्याला कोरोनाचा वेग संथ करण्यास यश येत असल्याचे म्हटले आहे. राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा 6 हजारांच्या पार गेला आहे. त्यामुळे कोरोनाची साखळी तोडायची असल्यास सर्व नियमांचे पालन करावे असे आवाहन वारंवार नागरिकांना केले जात आहेत. त्याचसोबत नागरिकांनी सुद्धा सरकारला कोरोनाच्या लढाईत सहकार्य करावे.