Salman Khan House Firing: अभिनेता सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार करणाऱ्या आरोपींना पकडण्यात मुंबई पोलिसांना यश, गुजरातमधून अटक
Two accused Salman Khan House Firing PC ANI

Salman Khan House Firing: अभिनेता सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार केल्याप्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे. १४ एप्रिल रोजी पहाटे वांद्रा येथील गॅलेक्सी अपार्टमेंटजवळ गोळीबार केली होती. या घटनेचा सीसीटीव्ही फुटेज देखील व्हायरल होत होता. पोलिसांनी सर्व सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले होते. मुंबई गुन्हे शाखा पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. या आरोपींना मंगळवारी गुजरातच्या भुज जिल्ह्यातून पकडण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.हेही वाचा- बिश्नोई गँगने गोळीबाराची जबाबदारी स्वीकारत भाईजानला दिली धमकी

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपींबाबत अधिक माहिती पोलिस लवकरच उघड करतील. पहाटे पाच वाजता आरोपी गोळीबार करून फरार झाले होते. दोन ते तीन राऊंड फायरिंग झाली होती.गोळीबारानंतर आरोपी मुंबईतून पळून गुजरात येथील भुज परिसरात होती. पोलिसांना गुपित माहिती मिळाली आणि आरोपींना अटक केले. पुढील कारवाईसाठी मंगळवारी दुपारी त्यांना न्यायालयात हजर केले जाईल.

आरोपींकडून विदेशी पिस्तूल, जिवंत काडतुसे, मोबाईल, रोख रक्कम आणि बाईक जप्त केली आहे. आरोपींनी पोलिस चौकशीत गुन्ह्याची कबुली केली आहे. दोघे ही गुजरातला फरार झाल्यानंतर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून आरोपींना पकडण्यात मुंबई पोलिसांना यश आले आहे.