उद्या तिन्ही रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक, प्रवाशांचे होणार हाल
मुंबई लोकल Photo Credit : PTI

पश्चिम रेल्वे मार्गावर माटुंगा ते मुंबई सेंन्ट्रल दरम्यान आज विविध कामासाठी रात्री 11.55 वाजल्यापासून चार तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे. तर उद्या (26 मे) मध्य रेल्वेवरील मुख्य मार्गावर मुलुंड ते माटुंगा अप जलद मार्ग आणि हार्बर मार्गावर वडाळा ते मानखुर्द या मार्गावर ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे प्रवाशांचे हाल होणार असून त्यांनी गाड्यांच्या बदललेल्या वेळापत्रकानुसार बाहेर पडावे.

मध्य रेल्वेवरील गाड्या उद्या संध्याकाळी 6 वाजेपर्यंत उशिराने धावणार आहेत. तर मुलुंड ते माटुंगा अप जलद मार्गावर 11.15 ते 3.45 पर्यंत ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे सीएसएमटीकडे जाणाऱ्या जलद लोकल दिवा ते परळ दरम्यान धिम्या मार्गावर वळवण्यात आल्या आहेत.त्याचसोबत सीएसएमटी कडून जलद आणि अर्धजलद मार्गावरील लोकलल ब्लॉकच्या वेळी घाटकोपर, विक्रोळी, भांडुप, दिवा आणि मुलुंड स्थानकात थांबणार आहेत.

तसेच दादरवरुन ब्लॉकच्यावेळी प्रवाशांना दिव्याला पोहचता यावे यासाठी दुपारी 3.40 वाजता विशेष लोकल सोडण्यात येणार आहे.(मुंबई: चर्चगेट दिशेने जाणाऱ्या रेल्वेखाली महिलेची चिमुकल्यासह उडी; महिला ठार, बाळ सुखरुप, जोगेश्वरी रेल्वे स्टेशनवरील घटना)

तर हार्बर मार्गावरील वडाळा ते मानखुर्द दोन्ही मार्गावर ब्लॉक घेण्यात येणार आहे. तसेच सकाळी 10.40 ते 4.10 पर्यंत हा ब्लॉक सुरु राहणार आहे. त्यामुळे सीएसएमटी ते वाशी, बेलापूर, पनवेल मर्गावरील दोन्ही दिशेच्या लोकल रद्द करण्यात आल्या आहेत.