Molestation | Photo Credits: Archived, edited, symbolic images)

Mumbai News: राज्यात गुन्हेंगारीचे प्रमाण वाढत चालले आहे दरम्यान गुरु शिष्याच्या नात्याला काळीमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. 16 वर्षीय मुलीच्या शिक्षकाने लैंगिक छळ (Molestation) केल्याचा आरोप केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सायन (Sion) येथील राहणारी पीडित तरुणी सायन कोळीवाडा परिसरात खासगी क्लासेसला जात होती. तेव्हा ही घटना घडली. या घटनेने शहरात मोठी खळबळ उडाली आहे. आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.( हेही वाचा- अ‍ॅन्टॉप हिल भागात 16 वर्षीय मुलीचा शिक्षकाकडून विनयभंग)

गेल्या महिन्यापासून आरोपीने तिच्या जवळ जाण्याचा प्रयत्न केला, तिला क्लासेसमध्ये अयोग्यरित्या स्पर्श करत राहिला. आरोपीची वाढत्या छळाने मुलीने क्लासेसला जाणे बंद केले आणि घरीच राहिली. पोलिसांनी सांगितले की, तिने ट्यूशनला जाण्यासाठी पालकांना आजारी असल्याचे कारण दिले, आणि एक दिवस तिच्या पालकांसमोर टाळाटाळ करत होती. काही दिवसांनी १ ते १४ नोव्हेंबर दरम्यान घडलेली संपुर्ण घटना तिच्या पालकांना सांगितली. पालकांना हे ऐकून धक्काच बसला. आरोपीचे नाव सुशील भरत राय असे असून तो कोळीवाडा परिसरातील प्रतीक्षा नगरचा रहिवाशी आहे.

त्यांनी त्यांचे चार्टर्ड अकाउंटंट (CA) वर्ग चालवले जेथे त्यांनी विद्यार्थ्यांना त्यांच्या कॉमन प्रोफिशियन्सी टेस्ट (CPT) साठी शिकवले, जी CA अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी एक प्रवेश-स्तरीय परीक्षा आहे.पीडितेने दहावीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर ती सीए प्रवेश परीक्षेची तयारी करत होती. पीडितांने पालकांसोबत पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल केला. भारतीय दंड संहिता आणि लैंगिक गुन्ह्यांविरूद्ध मुलांचे संरक्षण (POCSO) विनयभंग आणि लैंगिक अत्याचाराच्या आरोपाखाली पोलिसांनी शनिवारी संध्याकाळी आरोपीला अटक केली.